Dolly Chaiwala : दुधाला जीभ लावण्याचा किळसवाणा प्रकार करणाऱ्या डॉलीभाईच्या टपरीवर का पोहोचले बिल गेट्स?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी बिल गेट्स हे हैद्राबादमध्ये असताना त्यांनी चहा विक्रीच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉली चहावाल्याच्या टपरीवर जाऊन चहा प्यायली. सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दुधाला जीभ लावण्याचा किळसवाणा प्रकार करणाऱ्या नागपुरातील डॉली चहावाल्याचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर डॉली त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत आला. डॉली चहावाल्याचे पूर्ण नाव डॉली मारुती पाटील असे असून तो नागपूर येथे 'डॉली की टपरी' नावाने चहाचा धंदा चालवतो.
advertisement
advertisement
हैद्राबादला प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांना चहा पाजून आलेल्या डॉलीशी पत्रकारांनी बातचीत केली. यावेळी त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका टीमने त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्याला परदेशी लोकांना चहा प्यायल्या देण्यासाठी हैद्राबाद येथे येण्यास सांगितले होते. त्यानुसार डॉली हा हैद्राबाद येथे गेला आणि तेथे त्याने 8 परदेशी लोकांना स्वतः बनवलेली चहा पाजली.
advertisement
रजनीकांत स्टाईलने चहा बनवण्याच्या डॉलीच्या पद्धतीने सर्वच इम्प्रेस झाले होते. यावेळी बिल गेट्स यांनी डॉलीसोबत व्हिडीओ काढला. परंतु आपल्या सोबत व्हिडीओ काढणारा व्यक्ती प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स आहे याची पुसटशी कल्पना देखील डॉलीला नव्हती. डॉली चहावाला जेव्हा पुन्हा नागपुरात आला तेव्हा त्याच्या मित्रांनी सांगितले की तुझ्या सोबत व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हा साधारण नसून ते मोठे उद्योगपती बिल गेट्स आहेत.
advertisement
डॉलीला हे कळताच तो भारावून गेला. डॉलीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्या टपरीवर चहा पिण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. डॉली चहावाल्याने मीडियाशी बोलताना म्हंटले की, माझी इच्छा आहे की अशाच प्रकारे मी नागपूरच नाव रोशन करावे आणि पुढे जाऊन पंतप्रधान मोदी यांना सुद्धा आपण स्वतः तयार केलेली चहा पाजण्याची इच्छा असल्याचे डॉलीने सांगितले.










