Missile नव्हे सैतान, देश नव्हे अख्खा खंड उडवण्याची ताकद; महाविनाशक अस्त्र पाहून अमेरिकाही हादरली

Last Updated:
जगभरातील देश आज सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात भयावह क्षेपणास्त्र मानल्या जाणाऱ्या मिसाइलविषयी माहिती घेऊया.
1/8
 जगभरातील देश आज सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत. यामध्ये सर्वात प्रभावी मानली जाणारी शस्त्रप्रणाली म्हणजे ‘अंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रणाली’ अर्थात इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स (ICBM).

advertisement
2/8
 या शस्त्रप्रणालीमधून केवळ एका बटणाच्या माध्यमातून संपूर्ण खंडावर हल्ला केला जाऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर, आज आपण जगातील सर्वात भयावह क्षेपणास्त्र मानल्या जाणाऱ्या रशियाच्या 'RS-28 Sarmat' अर्थात ‘सैतान २’ या मिसाइलविषयी माहिती घेणार आहोत.

3/8
 ‘RS-28 Sarmat’ ही मिसाइल रशियाने विकसित केलेली एक महाकाय आणि विनाशकारी बॅलिस्टिक मिसाइल आहे. याला ‘सैतान’ असे टोपणनाव देण्यात आले असून, ही मिसाइल जगात कुठल्याही ठिकाणी अणुबॉम्बने हल्ला करण्याची क्षमता ठेवते.

4/8
 या क्षेपणास्त्राची कमाल मारक क्षमता जवळपास १८,००० किलोमीटर असल्यामुळे रशिया जर इच्छित असेल तर कोणत्याही देशावर थेट त्याच्या भूमीतून प्रचंड नाशक हल्ला करू शकतो. ही मिसाइल जवळपास २०८ टन वजनाची असून तिची लांबी ३५ मीटर इतकी आहे.

5/8
 विशेष म्हणजे या मिसाइलमध्ये एकाच वेळी १५ अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली ही मिसाइल केवळ भौगोलिक अंतरावर विजय मिळवतेच, पण शत्रूच्या मिसाइल डिफेन्स सिस्टमला चकवून आपलं लक्ष्य अचूकपणे भेदू शकते. त्यामुळेच ती अत्यंत धोकादायक मानली जाते.

6/8
 या मिसाइलच्या निर्मितीमागे रशियाचा एक प्रमुख उद्देश म्हणजे अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हा आहे. म्हणजेच ही मिसाइल ‘डीटेरन्स स्ट्रॅटेजी’ म्हणजे प्रतिकारशक्ती म्हणून काम करते. ही मिसाइल जर रशियाकडे आहे, हेच शत्रूपक्षाला धडकी भरवणारे ठरते.

7/8
 अमेरिकन बाजारमूल्यानुसार या मिसाइलची किंमत सुमारे ३५ मिलियन डॉलर इतकी आहे, तर भारतीय रुपयांमध्ये याचा खर्च जवळपास २९० कोटींचा आहे. या मिसाइलच्या विकसनामुळे रशिया आता आणखी सामरिकदृष्ट्या मजबूत आणि खतरनाक राष्ट्र म्हणून पुढे आले आहे.

8/8
 जगातील राजकीय व सामरिक तणाव पाहता, अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांची भूमिका केवळ युद्धातच नाही, तर युद्ध टाळण्यामध्ये सुद्धा महत्वाची ठरते. म्हणूनच ‘सैतान २’ ही मिसाइल जगातील सर्वात भयावह आणि सामरिकदृष्ट्या प्रभावी अस्त्र मानली जाते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement