Amit Shah : शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शह स्पष्ट बोलले, म्हणाले पुत्र-पुत्रीच्या मोहात..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Amit Shah : महाराष्ट्रातील भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचं खुलेआम सांगत असताना अमित शहा यांनी याचं खापर दुसऱ्यावरच फोडलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणखी एक भिडू सोबत घेण्याच्या तयारीत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यापूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला फोडल्याचा आरोप भाजपवर होत आहे. मात्र, हे पक्ष आम्ही फोडले नसून केवळ पुत्र-पुत्रीच्या प्रेमामुळे फुटले असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. गृहमंत्री शाह यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत आम्ही कोणताही पक्ष फोडला नसल्याचे सांगितले. अनेक पक्ष केवळ मुला-मुलींच्या हट्टापायी तुटल्याचं शहा म्हणाले.
पुत्र-पुत्रीच्या प्रेमामुळे पक्षात फूट
अमित शहा म्हणाले, की मी पुन्हा पुन्हा सांगतो की, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुत्र-पुत्रीच्या मोहापायी विभागले आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं होतं, तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्या बनवायचे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत काम करणाऱ्यांनी आधी उद्धव ठाकरेंना आपला नेता म्हणून स्वीकारले. पण त्यांनी आदित्य यांना आपला नेता मानण्यास नकार दिला. पवारांनाही आपली मुलगी सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्या बनवायचे होते. हे मान्य करायला तयार नसलेल्या अनेकांनी पक्ष सोडले.
advertisement
ठाकरे कुठे चुकले?
शहा म्हणाले की जर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना योग्य सन्मान दिला असता तर शिवसेना कधीच फुटली नसती. तर दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांना योग्य वागणूक न दिल्याने अजितदादांनी त्यांची साथ सोडली नसते. शिंदे आणि अजित पवार आमच्यासोबत कधीच आले नसते. कारण, ते सत्तेत होते. मात्र, अनेक ठिकाणी अपत्यप्रेमापोटी पक्ष फुटलेले आपण पाहिले आहेत.
advertisement
महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार
लोकसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेत महाराष्ट्रात आपले 20 उमेदवार जाहीर केले आहेत. तर आणखी दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यावेळी 2019 लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2024 4:13 PM IST
मराठी बातम्या/राजकारण/
Amit Shah : शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शह स्पष्ट बोलले, म्हणाले पुत्र-पुत्रीच्या मोहात..








