Maharashtra Election 2024: मतदान करा, 20 टक्के सवलत मिळवा, कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी लढवली शक्कल!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत विविध उपक्रम आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत विविध उपक्रम आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. अशातच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सोने-चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन कोल्हापूर आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्ड स्मिथ फेडरेशन या ज्वेलरी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान शंभर टक्के होण्यासाठी प्रशासनाबरोबर खारीचा वाटा उचलताना पाहायला मिळतय. मतदान केल्यानंतर सोन्याच्या दागिन्यांवर घेण्यात येणाऱ्या मजुरीवर 20 टक्के सूट यांच्यामार्फेत देण्यात येणार आहे.
advertisement
काय आहे सवलत?
सोने-चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्ड स्मिथ फेडरेशन यांच्या वतीने मतदान करणाऱ्यां नागरिकांना सोन्याच्या दागिन्यांवर घेण्यात येणाऱ्या मजुरीवर 20 टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली आहे. ही सवलत येत्या 20 नोव्हेंबर पासून म्हणजेच मतदानाच्या दिवशी पासून सुरू होणार आहे. आणि एक डिसेंबर 2024 पर्यंत ही योजना कार्यान्वित असणार आहे.
advertisement
Maharashtra Assembly Election 2024 Voting LIVE
काय असणार आहे अट ?
या योजनेमध्ये नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी म्हणजेच 20 तारखेला मतदान केल्यानंतर बोटावरील मतदान केलेली शाई दाखवावी आणि या डिस्काउंट योजनेचा लाभ घ्यावा असा आवाहन अध्यक्ष नचिकेत भुरके आणि असोसिएशन मार्फत करण्यात आलय. ही योजना मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात शंभर टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
advertisement
येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेचे मतदान पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 20 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. एवढेच नव्हे तर मतदानाचा दिवस हा साप्ताहिक सुट्टीला न जोडता स्वतंत्र असा बुधवार ठेवण्यात आला आहे जेणेकरून शनिवार रविवार या साप्ताहिक सुट्टीला फिरण्यासाठी सलग जोडून आणि पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नये प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आणि सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना नियोजन करून जनजागृती केली जात आहे.
advertisement
अंधेरीचा राजा कोण? मशाल पेटणार की धनुष्य'बाण' निशाण्यावर लागणार?
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 19, 2024 4:03 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Election 2024: मतदान करा, 20 टक्के सवलत मिळवा, कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी लढवली शक्कल!

