Rahul Gandhi : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, 'आम्ही मैदानात उतरलो...'

Last Updated:

Rahul Gandhi : पोलिसांनी आंदोलक खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, 'आम्ही मैदानात उतरलो...'
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, 'आम्ही मैदानात उतरलो...'
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आता राजकारण पेटू लागले आहे. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अटकाव केला. दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलक खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
advertisement

राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात, पहिली प्रतिक्रिया समोर...

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संताप व्यक्त करताना संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, ही लढाई राजकीय नाही. संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढतोय असं राहुल गांधी म्हणाले. संविधानाने दिलेले 'एक व्यक्ती एक मत' या मूल्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केली.
advertisement

दिल्ली पोलिसांकडून मोर्चा कोंडी....

कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू न देण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. मोर्चासाठी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या परिसरात जमले. त्यावेळी पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावत खासदारांची कोंडी केली.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/Politics/
Rahul Gandhi : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, 'आम्ही मैदानात उतरलो...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement