advertisement

Rohit Pawar : अजितदादांना कुटुंबातून एकटं पाडलं? 'त्या' प्रकरणावर रोहित पवार स्पष्टच बोलले

Last Updated:

Rohit Pawar : श्रीनिवास पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या सर्व प्रकरणावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांना कुटुंबातून एकटं पाडलं?
अजितदादांना कुटुंबातून एकटं पाडलं?
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : पवार कुटुंबातील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी बारामती येथील काटेवाडी ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. यानंतर अजित पवार गटाकडूनही प्रतिउत्तर देण्यात आले आहे. पवार कुटुंबात अजित पवारांना एकटं पाडलं असल्याचा आरोप अजितदादा गटाकडून करण्यात आला आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार (Rohit Pawar) आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं.
आम्ही नाही तर ते स्वतःहून एकटे पडलेत : रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकटं पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच श्रीनिवास पवार यांनीही अजितदादांवर टीका केली. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं. शरद पवार यांना सोडून जाणं योग्य नव्हतं ही भूमिका श्रीनिवास पवार यांनी दाखवून दिली. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचेही हेच मत असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांना पवार कुटुंबीयांनी एकट पाडलं नाही तर अजित पवार स्वतःहून एकटे पडल्याचेही रोहित पवार म्हणाले.
advertisement
अमोल मिटकरींवर रोहित पवारांची खोचक टीका
श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी टीका करत श्रीवास पवार यांना पुत्राचा मोह झाला असल्याचे विधान केले होते. मात्र, त्या व्यक्तीची लायकी लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून वेळ वाया घालवणार नाही अशी खोचक टीका रोहित पवार यांनी अमोल मिटकरीं वर केली आहे.
advertisement
जळगाव रावेर लोकसभेतील भाजपचे उमेदवार बदलण्याची चर्चा : पवार
जळगाव रावेर लोकसभेतील भाजपचे उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू झालेली आहे. भाजपचे निर्णय केंद्रातून घेतले जातात व ते राज्याला स्वीकारावे लागतात. त्यामुळे राज्यातील नेत्यांनाच केंद्राच्या नेत्यांसमोर काही बोलता येत नाही. तर जिल्ह्याचे नेते काय बोलणार? असा टोला रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. तर भाजप हा हुकूमशाही पाळणारा पक्ष असून केंद्रातून एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलला जात नसून महाराष्ट्रात कुठलाही निर्णय होत नसून सगळ्या गोष्टीसाठी दिल्लीला जावे लागते व दिल्लीतून निर्णय बदलले जातात, अशी प्रतिक्रिया ही रोहित पवार यांनी दिली आहे.
advertisement
मनसे भाजपची युती होणार असल्याची चर्चा असून त्यासाठी राज ठाकरे हे दोन दिवसापासून दिल्लीत आहेत. मात्र, राज ठाकरेंनी युवकांची भूमिका घेऊन भाजप विरोधात लढल्यास ते जास्त योग्य ठरू शकते असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. तर राज ठाकरेंनी नेहमी मराठी अस्मिता जपली असून केंद्रात भाजप सरकार आलं तेव्हापासून महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून गुजरातचं वाढवलं जात आहे. ते स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही. तसेच राज ठाकरे मराठी स्वाभिमानी आहेत. ते भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेणार नसल्याचा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीसोबत येण्याचा राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा असेही रोहित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/राजकारण/
Rohit Pawar : अजितदादांना कुटुंबातून एकटं पाडलं? 'त्या' प्रकरणावर रोहित पवार स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement