Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मास्टरप्लान तयार; कार्यकर्त्यांना दिले आदेश

Last Updated:

Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेला झालेली चुक विधानसभेत टाळण्यासाठी भाजपने आपल्या रणनितीत बदल केला आहे.

News18
News18
मुंबई : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अंग झटकून कामाला लागलं आहे. लोकसभेतील चुका विधानसभेसाठी टाळण्यासाठी भाजपने आपल्या रणनितीमध्ये बदल केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नवीन रणनिती आखली आहे.
विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आणि सह प्रभारी करणार राज्यभर दौरा करणार आहेत. ते मंडल स्तरावर विशेष लक्ष देणार आहेत. सुपर वॉरियर बंद करून शक्ती केंद्रासाठी काम करणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक विधानसभेत पुर्णवेळ विस्तारक म्हणून नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासोबत जिल्हाध्यक्ष आणि युवा कार्यकर्त्यांकडेही विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे. लोकसभेतील घोळ असलेल्या मतदार याद्या सुधारून घेण्याचे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आलेत. सरकारी योजना घरोघरी पोहोचवताना पक्षालाही त्याचा फायदा कसा होईल याकडे लक्ष द्या, असे आदेश सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
advertisement
विधानसभा निवडणुका कधी होणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच पुण्यात बोलताना ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील, असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे. हरियाणा राज्यातील विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळं या 2 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते. या नियमानुसार महाराष्ट्रात आणि हरियाणात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
वाचा - अजितदादांना सोबत का घेतलं? फडणवीस म्हणाले, कधी मान, अपमान, कधी तह तर कधी..
महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मास्टरप्लान तयार; कार्यकर्त्यांना दिले आदेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement