मशरुम कसे तयार केले जाते?, पुण्यात कृषी महाविद्यालयात दिलंय जातंय प्रशिक्षण, शेतकऱ्यांनाही होतोय फायदा

Last Updated:

मशरुमचे वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्यांची लागवड तंत्रज्ञान हे वेगवेगळे आहे. मोठ्या प्रमाणात केल जाणार बटण मशरूम, दुसरे धिगरी आळंबी तर हे करण्यासाठी अगदी सोपे आहे. कमी जागेत कमी खर्चात, हे तयार केले जाते. 

+
मशरूम

मशरूम कसं तयार होतं?

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मशरुमचे उत्पादन घेतले जाते. याचे अनेक फायदेही आहेत. त्याच प्रमाणे पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम नेहमीच घेतले जातात. त्यामध्ये मुलांना कार्यनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच महाविद्यालयात मशरूम शेती कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शनही मुलांना तसेच शेतकऱ्यांना केले जाते. याचे उत्पादन कसे केले जाते, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
advertisement
कृषी महाविद्यालयातील मायकोलॉजिस्ट डॉ. अशोक सी. जाधव यांनी याबाबत माहिती दिली. 1983 साली आळंबी संशोधन केंद्र हे महात्मा फुले कृषी महाविद्यालयाअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या आळंबीवर संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत ट्रेनिंग, प्रदर्शन, मेळावे प्रकल्प भेट यामार्फत लागवड तंत्रज्ञान पोहचवले जाते. तसेच मशरुमचे वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्यांची लागवड तंत्रज्ञान हे वेगवेगळे आहे. मोठ्या प्रमाणात केल जाणार बटण मशरूम, दुसरे धिगरी आळंबी तर हे करण्यासाठी अगदी सोपे आहे. कमी जागेत कमी खर्चात, हे तयार केले जाते.
advertisement
हे करण्यासाठी प्रथम बियाणे हवे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भुसा किंवा ज्याला आपण काढ म्हणतो, हे निर्जंतुक करून वापरावे. हे काढ एका पोत्यात भरून ठेवावे. त्यानंतर गरम पाणी प्रक्रिया करावी. नंतर ते बेड भरण्यासाठी 2 टक्के प्रमाणात बियाणे वापरावे. पिशवीचे तोंड बांधून टाचणीने 30 छिद्र पाडावी आणि बेड उबण्यासाठी ठेऊन बुरशीची वाढ झाल्यावर बेड शिक्यावर किंवा रॅकवर ठेऊन पाण्याची फवारणी करावी. त्यानंतर काढणी योग्य बेड हे 3 ते 4 दिवसात आल्यावर काढून, दुसरा आणि तिसरा बहर हा 15 दिवसाच्या अंतराने काढले जातात.
advertisement
या आहेत मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू, अद्भूत असा इतिहास, photos
कृषी महाविद्यालया अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी प्रशिक्षण हे दिले जाते. यासाठी हजार रुपये इतके शुल्क आकारून हे प्रशिक्षण 10 ते 5 या वेळात देण्यात येते. त्याचप्रमाणे चतुर्थ वर्षातील शिकणाऱ्याला मुलांना मशरुमचे लागवड तंत्रज्ञान, मार्केट बदलदेखील प्रशिक्षण दिल जाते. यामुळे भविष्यात त्यांना याचा फायदा करून घेऊन आपला छोटा व्यवसाय करू शकतात, असेही कृषी महाविद्यालयातील मायकोलॉजिस्ट डॉ. अशोक सी. जाधव यांनी सांगितले.
मराठी बातम्या/पुणे/
मशरुम कसे तयार केले जाते?, पुण्यात कृषी महाविद्यालयात दिलंय जातंय प्रशिक्षण, शेतकऱ्यांनाही होतोय फायदा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement