Pune News: पारंपरिक ते आधुनिक कलेपर्यंत सर्व काही; पुण्यात सजणार ‘कारीगर बाजार’
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारा दस्तकारी हाट क्राफ्ट प्रदर्शन यंदा पुण्यात भरला आहे.दस्तकारी हाट समिती, पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कार्यक्रम यांच्या सहकार्याने हा उपक्रम कलाग्राम येथे आयोजित करण्यात आला आहे
पुणे: भारत हा विविधतेत एकतेचा देश म्हणून ओळखला जातो. भारताच्या प्रत्येक भागात काहीतरी खास कलागुण दडलेला आहे. या पारंपरिक कलेचा आणि भारतीय हस्तकलेचा अद्भुत संगम आता पुणेकरांना अनुभवता येणार आहे. पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारा दस्तकारी हँड क्राफ्ट प्रदर्शन यंदा पुण्यात भरला आहे. दस्तकारी हाट समिती, पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कार्यक्रम यांच्या सहकार्याने हा उपक्रम कलाग्राम येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाविषयी दस्तकारी हाट समितीच्या प्रमुख चारू वर्मा यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
दस्तकारी हाट समितीच्या प्रकल्प प्रमुख चारू वर्मा यांनी सांगितलं की, ही समिती जया जेटली यांनी स्थापन केली आहे. गेल्या 40 वर्षांपासून दस्तकारी हाट समिती देशभरातील कारागिरांसाठी काम करत आहे. पुण्यातील हे क्राफ्ट प्रदर्शन गेल्या 10 वर्षांपासून आयोजित केला जातो. यंदा या उपक्रमाचं 11 वर्ष आहे. हे प्रदर्शन 30 ऑक्टोबरपासून सुरू झालं असून, 9 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे. देशभरातील कारागीर आणि कलाकार यांच्या 120 हून अधिक स्टॉल्स येथे पाहायला मिळतात. प्रदर्शनात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नामांकित कारागीर सहभागी झाले आहेत.
advertisement
प्रदर्शनात देशभरातील कारागिरांचा समावेश
या प्रदर्शनात चन्नपट्टणातील लाकडी खेळणी बनवणाऱ्या मिनू जोशी, नागपूरचे कोसा सिल्क साडी विणकर प्रवीण बडवे, बंजारा भरतकाम तज्ज्ञ रोहित राठोड, कोल्हापुरी चप्पल तयार करणारे संतोष मोरे आणि पारंपरिक घोंगडी विणणारे नीरज बोराटे यांचा समावेश आहे.याशिवाय उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश आणि दिल्ली अशा विविध राज्यांतील कारागीर पिचवाई पेंटिंग, गोंड आर्ट, क्रूएल एम्ब्रॉयडरी, सबाई ग्रास विणकाम, तसेच पारंपरिक धातुकला अशा विविध हस्तकलेचे दर्शन घडवत आहेत.या प्रदर्शनाला पुणेकरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:50 PM IST

