Pune News : बोर घाटातून प्रवास करताना सावधान; 'या' गोष्टीचा वाढला धोका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Last Updated:

bhor ghat : बोर घाटातून प्रवास करताना नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता वाढली आहे.

News18
News18
पुणे : पवनानगर-कामशेत रस्त्यावरील बोर घाटात दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतहा केदारेश्वर मंदिराजवळील परिसरात डोंगर भाग स्थिर न राहून सतत सैल होत आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचा उपयोग विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, दुभाध्यक्षसह पर्यटक मोठ्या संख्येने करतात, त्यामुळे इथे दरड कोसळल्यास अपघाताची शक्यता अत्यंत जास्त आहे.
मागील काही काळातील पावसामुळे डोंगरातील माती सैल झाली आहे आणि त्यावरचे झाडे आणि दगड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांच्या मते, दोन्ही बाजूच्या ढिगाऱ्यांवर मोठमोठी झाडे आणि माती असलेली ढिगरे धोकादायक स्थितीत आहेत. रात्री आणि अपरात्री या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना विशेष धोका भासतो. दरड कोसळल्यास वाहनांची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते आणि जीवही बळी जाऊ शकतो.
advertisement
नागरिकांनी याबाबत वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्थानिक लोक, व्यापारी आणि पर्यटक हे दररोज हजारो लोकांनी हा मार्ग वापरतो. त्यामुळे प्रशासनाने त्वरित जागरूक होऊन रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू करणे अत्यावश्यक आहे.
सध्या रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती असूनही प्रशासनाने अद्याप ठोस पाऊले उचललेले नाहीत. नागरिकांचा प्रश्न आहे की,''जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का?'' बोर घाटातील हा मार्ग सुरक्षित न होऊ दिल्यास अपघाताची शक्यता वाढेल आणि अनावश्यक बळी जाईल. त्यामुळे वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन तातडीने रस्त्याची पाहणी करावी, ढिगरे हटवावी, ढिगाऱ्यांवर संरक्षणात्मक कामे करावी आणि नागरिकांसाठी अलर्टसिस्टम सुरू करावी.
advertisement
बोर घाटातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही उपाययोजना अत्यंत गरजेची आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष दिल्यास अपघात टाळता येईल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळू शकेल.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : बोर घाटातून प्रवास करताना सावधान; 'या' गोष्टीचा वाढला धोका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement