ख्रिसमसला गव्हाणी का बनवली जाते, येशूच्या जन्माशी आहे खास कनेक्शन

Last Updated:

नाताळला येशू जन्माच्या देखाव्यात गव्हाणी दाखवली जाते. त्याचं काऱण खास आहे.

+
ख्रिसमसला

ख्रिसमसला गव्हाणी का बनवली जाते, येशूच्या जन्माशी आहे खास कनेक्शन

पुणे, 24 डिसेंबर: नाताळ हा आनंदाचा काळ आहे. येशूजन्माचे दृश्य हे येशूचा गोठ्यातील जन्म तसेच त्या वेळी घडलेल्या घटनांचे चित्रण आहे. ज्याने हरवलेल्या जगाला प्रेमळ देवाशी जोडले. त्या गोठ्यातून एक व्यक्ती आला ज्याने आपल्याला फक्त एक नवीन जीवनाचा मार्ग शिकवला. एवढेच नव्हे तर आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याशी एका नवीन नातेसंबंधात जोडले. देवाला लोकांच्या गोष्टींमध्ये आवड आहे, देव आपल्यावर एवढे प्रेम करतो कि त्याने आपल्यासाठी त्याचा पुत्र पाठवला, असाच नाताळचा अर्थ असल्याचे पुण्यातील विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राईस्ट चर्च मधील सिनियर पास्टर राहुल वाघमारे यांनी सांगितले.
का साजरा होतो नाताळ?
जेव्हा देवाने आपले पहिले पालक बनवले तेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मोडली म्हणून पाप आणि मृत्यू जगात आले. पण देवाने वचन दिले की तो जगाला वाचवण्यासाठी तारणारा पाठवेल. देवाच्या योग्य वेळेत, येशूचा जन्म झाला. तो देव देहरूपाने प्रकट झाला आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. त्याने संपूर्ण जगाची पापे घेतली आणि वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. बायबल म्हणते, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल, असे वाघमारे सांगतात.
advertisement
काय आहे गव्हाणी?
गव्हाणी एक रिप्लिका आहे, येशूच्या जन्माविषयी देखावा आहे. येशूचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झाला आहे. सध्याचा इस्रायल देश येथील बेथलहेम येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. येशू ख्रिस्त हे या धर्माचे संस्थापक मानले जातात. येशूचा जन्म गव्हाणीत झाल्याने नाताळला गव्हाणीची रिप्लिका बनवली जाते. त्या गव्हाणी मध्ये आपल्याला सगळे गुरढोर यांचा देखावा पाहायला मिळतो.
advertisement
नाताळचा संदेश
नाताळ साजरा करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या समुदायातील इतरांची सेवा करणे. अनाथ आश्रमात तुम्ही अन्नवाटप, कपडे वाटप करू शकता, तेथील मुलांबरोबर वेळ घालवू शकता. आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे अकस्मात जाऊन दयेची कृती करणे. रेस्टॉरंट मध्ये असताना शेजारच्या टेबलकडे जाऊन एका गरजवंत व्यक्तीचे बिल तुम्ही भरा. शेजारी राहत असलेल्या एखाद्या वृद्ध जोडप्याच्या दारात अनामिकपणे त्यांना एखादी भेटवस्तू द्या किंवा थंड हवामानामध्ये गरीब लोकांना उबदार कपडे दान करा, असेही पास्टर वाघमारे सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/पुणे/
ख्रिसमसला गव्हाणी का बनवली जाते, येशूच्या जन्माशी आहे खास कनेक्शन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement