Pune Police: वाहतूक नियमांची शाळा! येरवड्यात ट्रॅफिक अकादमीला मुख्यमंत्र्यांची मान्यता

Last Updated:

Pune Police: पुणे पोलिसांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. विशेषत: शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. पण, हा त्रास लवकरच कमी होणार आहे.

Pune Police: वाहतूक नियमांची शाळा! येरवड्यात ट्रॅफिक अकादमीला मुख्यमंत्र्यांची मान्यता
Pune Police: वाहतूक नियमांची शाळा! येरवड्यात ट्रॅफिक अकादमीला मुख्यमंत्र्यांची मान्यता
पुणे: वाढते औद्योगिकीकरण आणि विकास यांमुळे पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शिवाय लोकसंख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. परिणामी पुणे पोलिसांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. विशेषत: शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. पण, हा त्रास लवकरच कमी होणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयात वाहतूक कोंडीसंदर्भात प्रशिक्षण देणारी आधुनिक 'ट्रॅफिक' अकादमी स्थापन केली जाणार आहे.
या अकादमीमध्ये पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या अकादमीमध्ये पुणेकरांना आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालकांना देखील प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी (8 ऑगस्ट) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी 'यशदा' येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाहतुकीच्या संदर्भात सुरू असलेल्या कामाचं प्रेझेंटेशन केलं. मुंबईतील भायखळा येथे असलेली वाहतूक पोलीस प्रशिक्षण संस्था पुण्यात देखील असावी, असं मत अमितेश कुमार यांनी मांडलं. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही अकादमी पुण्यात सुरू आहे.
advertisement
वाहतूक प्रशिक्षण अकादमीसाठी शहरातील येरवडा भागात जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाहतूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना या अकादमीमध्ये एका महिन्याचं प्रशिक्षण दिलं जाईल.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची शाळा
वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांची या प्रशिक्षण अकदमीमध्ये चांगलीच खरडपट्टी करून शाळा घेतली जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना या वाहतूक प्रशिक्षण अकादमीत ठराविक कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. यामुळे नागरिकांना शिस्त लागेल. या अकादमीच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती देखील केली जाई
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Police: वाहतूक नियमांची शाळा! येरवड्यात ट्रॅफिक अकादमीला मुख्यमंत्र्यांची मान्यता
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement