Pune Crime : पुण्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होते काळे कारनामे, सापळा रचून पोलिसांची रेड, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला पाषाण येथील एका फ्लॅटमध्ये काळे कारनामे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, यानंतर त्यांनी या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला पाषाण येथील एका फ्लॅटमध्ये काळे कारनामे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, यानंतर त्यांनी या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पाषाणमध्या या फ्लॅटमध्ये स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होतं. गुन्हे शाखेने या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका केली आहे. पाषाण येथील साई चौक जवळच्या मिनिस्टर रेसिडेन्सी येथील एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची टीप पुणे पोलिसांना मिळाली होती, यानंतर मानव तस्करी विरोधी आणि अनैतिक तस्करी प्रतिबंधक युनिटने ही कारवाई केली.
आरोपी अमर दत्तू कांबळे हा फ्लॅट भाड्याने घेतला आणि मालकाला न कळवता, जागेचा वापर वेश्या व्यवसायासाठी सुरू केला. कॉन्स्टेबल इश्वर म्हातारदेव आंधळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकला, ज्यात वेलनेस स्पा च्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले.
सुटका केलेल्या महिलांना खोट्या नोकरीचे आश्वासन देऊन पुण्यात आणण्यात आले आणि त्यांना बेकायदेशीर व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले गेले, याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. गुन्हे शाखेने अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटशी संबंधित इतरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या व्यापक नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 11, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होते काळे कारनामे, सापळा रचून पोलिसांची रेड, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली!