इनामदार खून प्रकरणातील हलगर्जीपणा भोवला, सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे थेट निलंबन; नेमकं काय आहे प्रकरण?

Last Updated:

वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर न केल्याने आरोपींना जामीन मिळाला होता, ज्यावर न्यायालयाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

News18
News18
धाराशिव : तुळजापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नरवडे यांना तपासातील निष्काळजीपणा भोवला असुन पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी ठोस भुमिका घेत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गाजलेल्या सत्तार यासिन इनामदार खून प्रकरणात तपासातील हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर न केल्याने जामीन मिळाला होता, ज्यावर न्यायालयाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सिंदफळ येथे काही महिन्यांपूर्वी सत्तार यासिन इनामदार यांची हत्या झाली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांच्याकडे होता. कायद्यानुसार, अटकेच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, तपास अधिकारी म्हणून नरवडे यांनी वेळेत दोषारोपपत्र सादर केले नाही.

न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले 

advertisement
याच तांत्रिक चुकीचा फायदा घेत आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेवर दाखल न झाल्याच्या कारणावरून न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. या घडामोडीनंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. तपास अधिकाऱ्याच्या या चुकीमुळे आरोपींना एक प्रकारे मदतच झाल्याचे दिसून येत आहे.

कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ

सिंदफळ येथील सत्तार यासीन इनामदार यांच्या हत्येप्रकरणी तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, आरोपींना मदत करण्याच्या हेतूने नरवडे यांनी तपासात हेतुपुरस्सर दिरंगाई करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात वसीम गफूर इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती.  या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इनामदार खून प्रकरणातील हलगर्जीपणा भोवला, सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे थेट निलंबन; नेमकं काय आहे प्रकरण?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement