पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, कोणते असतील पर्यायी मार्ग; जाणून घ्या A To Z माहिती
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही सायकल स्पर्धा जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण कामासाठी वाहतुकीत बद्दल करण्यात आले आहेत.
प्रतिनिधी पूजा सत्यवान पाटील, पुणे
पुणे: राष्ट्रीय पातळीवरील 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026' ही सायकल स्पर्धा जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी महापालिकेच्या वतीने 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत संबंधित मार्गावरील वाहतूक सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत दुसऱ्या मार्गांवर वळविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील डांबरीकरणाच्या कामामुळे वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे. या कालावधीत मोरगाव ते मुर्टी मार्गावरील वाहनांची ये-जा मोरगाव – लोणीपाटी – लोणी भापकर – पेशवे वस्ती (कोऱ्हाळे बु.) – करंजेपूल – सोमेश्वरनगर या पर्यायी मार्गे करण्यात येईल.
advertisement
तसेच मुर्टी ते चौधरवाडी फाटा मार्गावरील वाहतूक मुर्टी – वाकी – करंजे – सोमेश्वरनगर येथे वळविण्यात येणार आहे. चौधरवाडी फाटा ते निरा मार्गावर दुरुस्ती सुरू असल्याने वाहनचालकांनी चौधरवाडी फाटा – करंजे – सोमेश्वर या मार्गाचा वापर करावा. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेदरम्यान वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहनचालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 7:22 PM IST


