Baramati Crime : पोरगं दारु पिऊन द्यायचं त्रास; आईवडिलांनी सुपारी देऊन काढला काटा; बारामतीतील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Baramati Crime : दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची आईवडिलांनी सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती, 1 सप्टेंबर : मुलगा दारू पिऊन त्रास देतोय म्हणून पोटच्या मुलाचा आई-वडिलांनी सुपारी देऊन खुन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मजुर दांपत्य, सुपारी घेवुन खुन करणाऱ्या 3 जणांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी एका 30 ते 40 वयोगटातील अनोळखी युवकाचा निर्घृण खुन करुन त्याचा मृतदेह रस्सी व तारेने मोठे दगड बांधुन बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील पाण्याच्या तलावात फेकुन दिला होता. त्यानंतर दाखल झालेल्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तालुका पोलिसांचे तपास पथक हे आजुबाजुच्या गावात तपास करीत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत दौंड तालुक्यातील रावणगाव कुटंबाबाबत माहिती मिळाली. पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई पोपट बाराते व मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातुन गेल्या 3 महिन्यापुर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर 15 दिवसांनी केवळ बाराते दांपत्यच गावातील घरी परत आले आहेत.
advertisement
मात्र, मुलगा सौरभ हा त्यांचे सोबत आला नसल्याची खात्रीशीर माहिती मोरे यांना मिळाली. पोलिसांनी पोपट बाराते याच्याकडे मुलगा सौरभ व पत्नी मुक्ताबाई यांचे ठावठिकाण्याबाबत विचारणा केली. यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काही माहीत नाही, माझ्या पत्नीला विचारा असे सांगितले. त्यावर पोलिसांनी बाराते दांपत्याची मुलगी निलम खुरंगे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी हिच्याकडे गेलेल्या मुक्ताबाई बारातेचा शोध घेतला.
advertisement
यावेळी मुक्ताबाईने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलगा सौरभ मला दारू पिऊन येवुन मारहाण करुन मला व माझे पती पोपट यांना त्रास देत होता. त्यामुळे गावातील बबलु तानाजी पवार याला मुलगा सौरभला जिवे ठार मारण्यासाठी 1 लाख 75 हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार बबलु याने त्याचे मित्र बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे असे मिळुन तिघांनी सौरभ यास ठार मारल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधुन टाकुन दिल्याचे देखील सांगितले. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
September 02, 2023 12:06 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Baramati Crime : पोरगं दारु पिऊन द्यायचं त्रास; आईवडिलांनी सुपारी देऊन काढला काटा; बारामतीतील घटना


