Ganeshotsav 2025: बाप्पा पावला! एसटी, रेल्वेनंतर विमान कंपनीचा मोठा निर्णय, पुण्यातून सिंधुदुर्गला जादा उड्डाणे
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ganeshotsav 2025: गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. पुण्याहून सिंधुदुर्गला जाण्यासाठी आता जादा विमान उड्डाणे चालवण्यात येणार आहेत.
पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे एसटी, रेल्वेला मोठी गर्दी असते आणि त्यासाठी जादा गाड्यांची सोयही करण्यात आली आहे. आता विमान कंपन्यांकडून देखील जादा उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा गणेशभक्तांना होणार आहे. फ्लाय 91 कंपनीकडून पुण्यातून सिंधुदुर्गला गणेशोत्सवात पाच दिवस जादा विमानेसवा चालवण्यात येणार असल्याची माहिती फ्लाय 91 चे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी दिली.
कोकणातील गणेशोत्सव प्रसिद्ध असून मुंबईतून लाखो चाकरमानी या काळात गावी जातात. तसेच पुण्यात कामानिमित्त स्थायिक झालेले कोकणवासीय देखील गणेशोत्सवासाठी मूळ गावी जातात. त्यामुळे दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बस सोडल्या जातात. तसेच रेल्वेकडून देखील विशेष गाड्यांची सोय केली जाते.
advertisement
यंदा विमानाची जादा उड्डाणे
view commentsयंदा बस आणि विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले असले तरीही त्याचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे अनेक भक्त विमानाने जाण्याला पसंती दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर फ्लाय 91 ने जादा विमानसेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोहगाव विमानतळ येथून सिंधुदुर्गसाठी थेट विमानसेवा आहे. या मार्गावर 24, 29, 31 ऑगस्ट आणि 5 व 7 सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे चालवण्यात येणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 20, 2025 9:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: बाप्पा पावला! एसटी, रेल्वेनंतर विमान कंपनीचा मोठा निर्णय, पुण्यातून सिंधुदुर्गला जादा उड्डाणे


