Pune News: हिंजवडीतील नागरिकांना दिलासा! आयटी पार्कमधील 'ही' मोठी समस्या सुटणार; 125 कोटींचा मास्टर प्लॅन

Last Updated:

एमआयडीसीने या पूरस्थितीवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, दोन टप्प्यांमध्ये कामे केली जाणार आहेत

125 कोटींचा मास्टर प्लॅन (फाईल फोटो)
125 कोटींचा मास्टर प्लॅन (फाईल फोटो)
पुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क दरवर्षी पावसाळ्यात अक्षरशः 'वॉटर पार्क'मध्ये बदलतो. यंदा ७ आणि २२ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे आयटी पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या समस्येमुळे आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
नैसर्गिक प्रवाहांचे उल्लंघन
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) तातडीने पाऊल उचलले. त्यांनी एका खासगी सल्लागार संस्थेद्वारे आयटी पार्कमधील नैसर्गिक जलप्रवाहांचे ड्रोन सर्वेक्षण करून घेतले. या सर्वेक्षणामध्ये, परिसरातील नैसर्गिक पाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे आणि ते प्रवाह बुजवले किंवा वळवले गेल्यामुळेच पूर येत असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
सल्लागार संस्थेने तयार केलेला हा सविस्तर अहवाल आयआयटी मुंबईकडे मूल्यमापनासाठी पाठवण्यात आला होता. आता तो अंतिम अहवाल एमआयडीसीकडे सादर झाला आहे.
१२५ कोटींचा उपाययोजना आराखडा
एमआयडीसीने या पूरस्थितीवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, दोन टप्प्यांमध्ये कामे केली जाणार आहेत:
advertisement
भूमिगत नाल्यांचे जाळे: आयटी पार्कमध्ये १७.५ किलोमीटर लांबीचे पावसाळी वाहिन्यांचे जाळे उभारले जाणार आहे.
भुयारी काँक्रीट नाले: विप्रो सर्कल ते सेझ सर्कल यासारख्या ज्या रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणात साचते, अशा ठिकाणी काँक्रीटचे भुयारी नाले बांधले जातील. यामुळे रस्त्यावर न साचता पाणी थेट या नाल्यांमधून वाहत जाऊन पुढे नदीला मिळेल.
स्वतंत्र नाले: डोंगरउतारावरून येणारे जलप्रवाह काही ठिकाणी रोखण्यात आले आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र नैसर्गिक नाले बांधले जातील, जेणेकरून हे पाणी थेट नदीपर्यंत पोहोचेल.
advertisement
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी सांगितलं की, पहिल्या टप्प्यात भुयारी नाले बांधले जातील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डोंगरउतारावरील पाण्यासाठी स्वतंत्र नाला बांधण्यात येईल. यामुळे हिंजवडीतील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: हिंजवडीतील नागरिकांना दिलासा! आयटी पार्कमधील 'ही' मोठी समस्या सुटणार; 125 कोटींचा मास्टर प्लॅन
Next Article
advertisement
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement