Hinjewadi Video: 'मस्ती करायची नाही', पुण्यात पोलिसांची दादागिरी; अजित पवारांच्या आमदारासमोर घडला प्रकार
- Published by:Prachi Amale
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
हिंजवडी ,माण परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी पोलिस बळाचा वापर केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.
पुणे : हिंजवडीत आय.टी. पार्क वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. हिंजवडी ,माण परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी पोलिस बळाचा वापर केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला होता. याच संदर्भातला एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.
हिंजवडी, माणमधीस अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानुसार PMRDA प्रशासनाने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरुवात देखील केली. मात्र कोणतेही नोटीस न देता बांधकामे पाडण्यासाठी का आलात असा जाब विचारणाऱ्या एका नागरिकासोबत पोलिसांनी दादागिरी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस बालाजी पांढरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ धक्के मारत अटक करण्याची धमकी दिल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
advertisement
सत्ताधारी आमदारांसमोर घडला प्रकार
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या समोर हा प्रकार घडत असतांना देखील ते पोलिसांच्या अशा दादागिरी समोर गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे . या घटनेचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याने हिंजवडी मान ग्रामस्थांमध्ये पोलिस आणि PMRDA प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
Watch Video :
पुण्यात पोलिसांची दादागिरी, हिंजवडीच्या ग्रामस्थांना शिवीगाळ pic.twitter.com/bTq5XeInK6
— VIRALबाबा (@viralmedia70) August 8, 2025
ग्रामस्थांचा विरोध
अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानुसार PMRDA प्रशासनाने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरवात देखील केली होती. मात्र ग्रामस्थाचा वाढता विरोध लक्षात घेता आता प्रशासन एक पाऊल मागे आले असून हिंजवडीतील अंतर्गत रस्ते विकास आराखड्यानुसार 36 मीटरचे नाही तर ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार 24 मीटरचे केले जातील अशी माहिती भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 08, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Hinjewadi Video: 'मस्ती करायची नाही', पुण्यात पोलिसांची दादागिरी; अजित पवारांच्या आमदारासमोर घडला प्रकार


