पीएमपी'मधून उतरत होती तरुणी; चालकाने केला दरवाजा बंद अन्...पुण्यातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

बसमधून उतरताना अचानक दरवाजा बंद झाल्याने तरुणी बस आणि बीआरटी मार्गाच्या संरक्षक कठड्याच्या मध्ये अडकल्याची अत्यंत भीषण घटना घडली

दरवाजात अडकली तरुणी (फाईल फोटो)
दरवाजात अडकली तरुणी (फाईल फोटो)
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून उतरत असताना एका तरुणीसोबत अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. बसमधून उतरताना अचानक दरवाजा बंद झाल्याने तरुणी बस आणि बीआरटी मार्गाच्या संरक्षक कठड्याच्या मध्ये अडकल्याची अत्यंत भीषण घटना गुरुवारी (२७ नोव्हेंबर) घडली. ही घटना सायंकाळी साठे बिस्किट चौकात घडली. या अपघातात तरुणीचा जीव सहप्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आहे.
साठे बिस्किट चौक येथे तरुणी बसमधून खाली उतरत असताना चालकाने लक्ष न देता अचानक दरवाजा बंद केला. यामुळे तरुणीच्या शरीराचा काही भाग दरवाजा आणि बीआरटीच्या प्लॅटफॉर्मच्या अरुंद जागेत अडकला. यावेळी तरुणी गंभीर जखमी होण्याचा धोका होता. परंतु, बसमधील आणि प्लॅटफॉर्मवरील सहप्रवाशांनी तत्काळ धाव घेऊन तिला ओढून सुरक्षितपणे बाहेर काढलं.
advertisement
चालकाचा दोष असल्याचा आरोप
या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणीने आणि तिच्या आईने बस चालकाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे. बस चालकाने प्रवासी पूर्णपणे उतरले आहेत की नाही, हे न पाहताच दरवाजा बंद केल्यामुळे हा धोकादायक प्रसंग घडला, असं त्यांचं म्हणणं आहे. बीआरटी मार्गात अशा घटना वारंवार घडत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.
advertisement
पुण्यात पुन्हा अपघात
दरम्यान पुण्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आज पुन्हा एका अपघाताची घटना समोर आली आहे. या विचित्र अपघातात 6 ते 7 वाहने एकमेकांना धडकली. येरवड्यातील गोल्फ चौक उड्डाणपूल नजीक ही घटना घडली . सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पीएमपी'मधून उतरत होती तरुणी; चालकाने केला दरवाजा बंद अन्...पुण्यातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Next Article
advertisement
Suprme Court On Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट, निवडणूक कार्यक्रम...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट, निवडणूक कार्यक
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट, निवडणूक कार्यक

  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट, निवडणूक कार्यक

  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट, निवडणूक कार्यक

View All
advertisement