Pune:कोमलची अशी काय चूक होती? यादव मामा-भाच्याने रस्त्यावर संपवलं पुण्यातील प्रकरणाचं सत्य समोर

Last Updated:

उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय इसम आणि मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली. 

News18
News18
पुणे : उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच एका अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दोन परप्रांतीय तरुणांनी कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरात रविवारी रात्री आरोपी  उदयभान यादव याने १८ वर्षीय तरुणी कोमल जाधवची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात उदयभानने आपल्या भाच्याची मदत घेतली होती. या दोघांनी अत्यंत थंड डोक्याने कट रचून कोमलची हत्या केली. दोघांनी एका दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. त्यानंतर  पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री कोमल भरत जाधववर धारदार शस्त्राने वार करून भर रस्त्यावर तिचा निर्घृण खून केला होता.   यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पण हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. तसेच हत्येचं कारण देखील सांगितलं.
advertisement
आर्थिक मदत केली अन् जवळीक जाण्याचा केला प्रयत्न
या प्रकरणी उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय इसम आणि मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी राहत होते.  शेजारी राहत असल्यामुळे दोघ एकमेकांना ओळखत होते. उदयभानने कोमलला आर्थिक मदतही केली होती. पण उदयभान यादवच्या मनात मात्र वेगळाचं चाललं होतं. तो कोमलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण कोमलने त्याला नकार दिला आणि फटकारून काढलं. याचा राग त्याच्या मनात होता. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
advertisement
मामा-भाच्याने केले कोमलवर वार
दरम्यान,  '8.30 वाजेच्या सुमारास रविवारी ही घटना घडली. आरोपी उदयभान यादव हा मुख्य आरोपी आहे. त्याने आपल्या भाच्याची मदत घेतली. दोघांनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि मानेवर वार केले. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे कोमलने जागेवर जीव सोडला. रात्रभर घटनेचा तपास करून लगेच दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी उदयभान हा कोमलच्या घराच्या समोर राहत होते. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहारातून त्याने कोमलची हत्या केल्याचं समोर आलं आहे, मुलगी अल्पवयीन आहे, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणाचा अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसपी सचिन हिरे यांनी दिली.
मराठी बातम्या/पुणे/
Pune:कोमलची अशी काय चूक होती? यादव मामा-भाच्याने रस्त्यावर संपवलं पुण्यातील प्रकरणाचं सत्य समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement