Pimpri-Chinchwad : पिंपरीत महामेट्रोकडून मेट्रोपाठोपाठ मोठ्या प्रकल्पाची घोषणा; नेमका नागरिकांना काय होणार फायदा?

Last Updated:

Nashik Phata Foot Over Bridge : पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा चौकात महामेट्रोकडून बहुप्रवासी पादचारी पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे नागरिकांना मेट्रो, बस, रेल्वे स्थानकांपर्यंत सुरक्षित आणि सोयीस्करपणे पोहचणे शक्य होणार आहे.

News18
News18
पिंपरी : मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये मेट्रो, एसटी, रेल्वे अशा विविध सार्वजनिक वाहतुकीचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला असला तरी स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित रस्त्यांचा अभाव ही मोठी समस्या होती. अनेक वेळा नागरिकांना रस्ता ओलांडताना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने आणि महामेट्रोकडून नाशिक फाटा चौकात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नाशिक फाटा चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. येथे निगडी-दापोडी दरम्यान दुहेरी बीआरटी मार्ग आहे तसेच भोसरी, चाकण आणि पुणे दरम्यान बससेवा उपलब्ध आहे. कासारवाडी येथे रेल्वे स्थानक असून पुणे-नाशिक महामार्गामुळे एसटी बससेवाही मोठ्या प्रमाणावर चालते. शिवाय मेट्रोचे नाशिक फाटा स्थानक या चौकाजवळ असल्यामुळे प्रवाशांसाठी हे ठिकाण अधिक गजबजलेले आहे.
advertisement
याशिवाय जेआरडी टाटा उड्डाण पुलावरून भोसरी आणि वाकड बीआरटी मार्गाशी जोडणी असल्याने दररोज हजारो प्रवासी या चौकातून प्रवास करतात. मात्र सुरक्षित रस्त्यांचा अभाव नागरिकांसाठी नेहमीच धोकादायक ठरत होता.
या दिवशी सुरु होणार पूल
या पादचारी पुलाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना बस, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षित आणि सोयीस्कर पोहोचता यावे हा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योजनेंतर्गत हा पूल उभारण्याचा निर्णय घेतला गेला असून प्रत्यक्ष काम महामेट्रोमार्फत सुरू आहे. सध्या या पुलाचे सुमारे 37 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत हा पूल वापरासाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
हा पूल शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी विशेषतहा बांधण्यात येणारा पहिला पूल ठरणार आहे. या पुलामुळे नागरिकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल,प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक बनेल. तसेच वाहतुकीची गती वाढेल, चौकातील गर्दी कमी होईल आणि अपघाताची शक्यता घटेल. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सोपा आणि सुखद होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri-Chinchwad : पिंपरीत महामेट्रोकडून मेट्रोपाठोपाठ मोठ्या प्रकल्पाची घोषणा; नेमका नागरिकांना काय होणार फायदा?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement