Pune News : पुणे RTO ची मोठी घोषणा! HSRP नंबर प्लेटची अंतिम मुदत जवळ; कारवाई टाळण्यासाठी काय कराल?

Last Updated:

Pune News : पुणेकरांनो एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत नोव्हेंबरच्या या तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. 2019 पूर्वीच्या वाहनांना ही प्लेट बसवणे बंधनकारक आहे.

News18
News18
पुणे : पुणेकरांनो एचएसआरपी नंबर प्लेटसंबंधी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पुण्यात वाहनांसाठी एचएसआरपी बसवण्याची अंतिम मुदत आता नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2019 पूर्वीचे सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. पुण्यात सुमारे 26 लाख वाहनांवर ही प्लेट बसवायची आहे पण आतापर्यंत फक्त नऊ लाख वाहनांवरच नंबर प्लेट बसवली गेली आहे. त्यामुळे शहरातील 35-40 टक्के वाहनांनाच ही सुरक्षित नंबर प्लेट लागली आहे.
शेवटची तारीख कोणती?
परिवहन विभागाने नागरिकांना एचएसआरपी बसवण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे. डिसेंबर 2024 पासून ही प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पाचवी वेळ असून शेवटची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरीही केवळ नऊ लाख वाहनांच्या नोंदणीच्या आधारे उर्वरित 17 लाख वाहनांना अजून नंबर प्लेट बसवायची आहे त्यामुळे पुढील काळात किती वाहनांवर ही प्लेट बसवली जाईल हा प्रश्न उभा राहतो.
advertisement
एचएसआरपी बसवण्यासाठी पुण्यात एका कंपनीला काम दिले असून त्यांनी ही कामे सुरू केली आहेत. पण वाहनांची संख्या एवढी जास्त आहे की दिलेल्या वेळेत सगळ्यांना प्लेट बसवणे आव्हानात्मक ठरत आहे.
राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले की दिलेली मुदत संपल्यावर एक डिसेंबरनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथक कारवाई करेल. पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की नागरिकांनी 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यात इतर शहरांच्या तुलनेत प्रतिसाद चांगला आहे, पण अंतिम मुदत न गेल्यानंतर कारवाई सुरू होईल.
advertisement
पुणेकरांनी जितक्या लवकर एचएसआरपी नंबर प्लेट बसवतील पण तितकी आपली वाहने कायद्याच्या अनुरूप सुरक्षित राहतील. त्यामुळे वाहनधारकांनी ताबडतोब नजीकच्या आरटीओ किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. मुदत संपल्यानंतर ही सेवा महागडी होऊ शकते तसेच कारवाई होण्याचा धोका देखील आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणे RTO ची मोठी घोषणा! HSRP नंबर प्लेटची अंतिम मुदत जवळ; कारवाई टाळण्यासाठी काय कराल?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement