दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! शिक्षण मंडळाने दिली अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; केव्हापर्यंत करता येणार अर्ज?

Last Updated:

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जे विद्यार्थी दहावी देणार आहेत आणि त्यांनी जर अजूनही परीक्षेचा अर्ज भरला नसेल तर त्यांना आता मुदतवाढ मिळाली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! शिक्षण मंडळाने दिली अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; केव्हापर्यंत करता येणार अर्ज?
दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! शिक्षण मंडळाने दिली अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; केव्हापर्यंत करता येणार अर्ज?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये 2026 मध्ये फेब्रुवारी- मार्चमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जे विद्यार्थी दहावी देणार आहेत आणि त्यांनी जर अजूनही परीक्षेचा अर्ज भरला नसेल तर त्यांना आता मुदतवाढ मिळाली आहे. परीक्षेसाठी विलंब शुल्कासह 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरू शकणार आहेत. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना हा एक प्रकारचा दिलासाच मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क हे ‘आरटीजीएस किंवा एनईएफटी’च्या माध्यमाने भरायचे आहे, जे 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये भरायचे आहे. त्यानंतर शाळांना विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट आणि चलन विभागीय मंडळाकडे 17 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे लागणार आहे. नियमित शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज हे ‘युडायस प्लस’मधील पेनआयडीवरून शाळा प्रमुखांमार्फत भरले जाणार आहेत. तर, पुन:र्परीक्षार्थी, 17 नं चा फॉर्म भरलेले विद्यार्थी, श्रेणीसुधार, तुरळक विषय घेणारे विद्यार्थी आणि ‘आयटीआय’मधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची अर्ज प्रक्रिया www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.
advertisement
शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मध्ये शाळा, संस्था, विषय आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करावी. शाळेने विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर प्री- लिस्ट तपासून आणि विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्याध्यापकांनी शिक्क्यासह ती यादी एकदा नीट तपासून घ्यावी. परीक्षा शुल्क हे केवळ ICICI बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्ये RTGS किंवा NEFT द्वारेच भरावे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
राज्य शिक्षण मंडळाचे सचिव पुढे म्हणाले की, अर्ज शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्थिती ‘सेंड टू बोर्ड’ आणि ‘पेड’ झाल्याची खात्री करणे ही शाळांची जबाबदारी राहील. अर्ज सादरीकरणासाठी पुन्हा जाहीर करण्यात आलेल्या तारखांना मुदतवाढ दिली जाणार नाही. ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेळेवर पूर्ण न करणाऱ्या शाळांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट दिली जाणार नाहीत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! शिक्षण मंडळाने दिली अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; केव्हापर्यंत करता येणार अर्ज?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement