अवकाळी संकट टळलं, आता पुन्हा थंडीचा जोर वाढणार, पाहा हवामानाचा अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
29 डिसेंबर रोज रविवारला राज्यातून पाऊस गायब होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील काही प्रमुख शहरात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : गेले 3 दिवस राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 27 डिसेंबरला राज्यातील तुरळक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. 28 डिसेंबरसाठी सुद्धा काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, 29 डिसेंबर रोज रविवारला राज्यातून पाऊस गायब होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. रविवारला राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. मात्र, थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील काही प्रमुख शहरात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात 29 डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मुंबईतील किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
29 डिसेंबरला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील किमान तापमान 31 अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. पुण्यातील किमान तापमानात देखील पुढील काही दिवसांत घट होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे.
छत्रपतीसंभाजीनगरमध्ये 29 डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असून तेथील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 29 डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये अवकाळी पावसानंतर आता थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विदर्भातील नागपूरमध्ये 29 डिसेंबरला सामान्यतः ढगाळ आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. त्यानंतर आता थंडीचा जोर देखील वाढणार आहे.
advertisement
गेले 3 दिवस राज्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर नागरिकांना आता दिलासा मिळालाय. 29 डिसेंबरला राज्यात कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, पुन्हा एकदा राज्यात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 28, 2024 7:42 PM IST

