Heat Wave : घराबाहेर पडताना काळजी घ्या! महाराष्ट्रात भयंकर उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat wave) येण्याचा अंदाज आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने कमी तीव्रता असू शकते.
मुंबई : राज्यात उष्णतेचा जोर वाढत आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या या काळात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat wave) येण्याचा अंदाज आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने कमी तीव्रता असू शकते.
advertisement
मुंबईत 10 एप्रिलला हवामान उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यामुळे आर्द्रता जास्त असेल, ज्यामुळे उकाडा अधिक जाणवेल. पुण्यात हवामान कोरडे आणि गरम असेल, कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस आणि किमान 21 ते 23 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. नागपुरात उष्णतेची लाट तीव्र असेल, कमाल तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस आणि किमान 26 ते 28 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते.
advertisement
नाशिकमध्येही तापमानाचा पारा चढाच राहील. कमाल 41 ते 43 अंश सेल्सिअस आणि किमान 22 ते 24 अंश सेल्सिअस असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस आणि किमान 24 ते 26 अंश सेल्सिअस राहील. सोलापुरात उष्णता तीव्र असेल, कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस आणि किमान 25 ते 27 अंश सेल्सिअस असेल. कोल्हापुरात तापमान तुलनेने कमी, कमाल 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान 22 ते 24 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
या काळात पावसाची शक्यता नाही, त्यामुळे कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहील. नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि हलके कपडे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 09, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Heat Wave : घराबाहेर पडताना काळजी घ्या! महाराष्ट्रात भयंकर उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

