विदर्भातील उष्णतेचा कडाका कमी होणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय स्थिती? पाहा हवामान अंदाज

Last Updated:

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरातील हवामान कसे असेल.

+
Heat

Heat wave

मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कमालीच्या उष्णतेच्या लाटेनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात तुरळक पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दमट आणि उष्ण हवामानाचा सामना करावा लागू शकतो. मुंबईतील कमाल तापमान बऱ्यापैकी कमी झालं असून मुंबईकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरातील हवामान कसे असेल.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. पुण्यामध्ये उष्णता कायम असणार आहेपुण्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
पुणे शहरामध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश राहण्याची देखील शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये देखील उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये 18 मार्च रोजी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल. कोल्हापूरातील आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील दोन दिवस निरभ्र आकाश राहील तर 19 मार्च रोजी संभाजीनगरमध्ये तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. संभाजीनगरातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.
तर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर नाशिकमध्ये निरभ्र आकाश राहील आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. विदर्भातील उष्णतेचा कडाका काहीसा कमी होणार आहेनागपूरमधील कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
विदर्भातील उष्णतेचा कडाका कमी होणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय स्थिती? पाहा हवामान अंदाज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement