Pune Traffic Diversion : पुणेकरांनो लक्ष द्या! कात्रज मुख्य मार्गावर वाहतुकीला ब्रेक; पर्यायी मार्ग कोणते?
Last Updated:
Chintamani School To Katraj Road Closed : पुण्यातील वाहतुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. चिंतामणी शाळा ते कात्रज दरम्यानचा रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात आला आहे.
पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ वाहतूक विभाग हद्दीत येणाऱ्या चिंतामणी ज्ञानपीठ शाळा ते कात्रज रोज मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग या दरम्यानच्या रस्त्यावर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामामुळे काही भागात तात्पुरता रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.
नेमका कोणता मार्ग असेल बंद?
28 सप्टेंबर 2025 रोजी चिंतामणी शाळा ते जिजामाता चौक या मार्गावरील रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी संयम बाळगावा आणि नियमांचे पालन करावे. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी तात्पुरते बदल लागू करण्यात आले असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
advertisement
याबाबतची सविस्तर माहिती पुणे वाहतूक पोलीसांच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक आणि ट्विटर हँडलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही माहिती स्थानिक वर्तमानपत्रांतूनही नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.वाहतुकीवरील मर्यादा केवळ दुरुस्तीच्या कामामुळेच लावण्यात आल्या असून काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना या रस्त्यावरील बंदोबस्त लक्षात घ्यावा.
advertisement
दरम्यान या रस्त्यावरील दुरुस्तीमुळे कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभाग विशेष पथक नियुक्त करणार आहे. हे पथक पर्यायी मार्गांवर वाहनचालकांना दिशा दाखविण्याचे काम करेल. त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:05 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Diversion : पुणेकरांनो लक्ष द्या! कात्रज मुख्य मार्गावर वाहतुकीला ब्रेक; पर्यायी मार्ग कोणते?