'जेव्हा ईडी आली तेव्हा त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते'; अजितदादांनी केलेल्या ऍक्टिंगला रोहित पवारांचं प्रत्युत्तर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
प्रचार सभेत बोलताना रोहित पवार भावुक झाले होते. अजित पवार यांनी दुसऱ्या सभेत त्यांची नक्कल करून दाखवली. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यांसाठी मतदान पार पडलं आहे. उद्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे त्या मतदारसंघातील प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस होता. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना आमदार रोहित पवार भावुक झाले. स्टेजवरच रोहित पवारांना रडू कोसळलं. विरोधकांनी शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या टीकेचा व्हिडीओ रोहित पवार यांनी जनतेला दाखवला. यावेळी ते चांगलेच भावनिक झाले.
दरम्यान त्यानंतर दुसऱ्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी रोहित पवार यांच्या भावनिक होण्याची नक्कल देखील केली. 'मी तुम्हाला सांगितलं होतं, शेवटच्या सभेत कुणीतरी काहीतरी भावनिक करायचा प्रयत्न करेल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो.' असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली. यावर आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
एक बारामतीकर म्हणून मी भाषण केलं, ते पवार कुटुंबातील सदस्य म्हणून केलेलं भाषण होतं. पवार साहेबांचं वय अजित पवारांनी काढलं हे वाईट होतं. मी भावनिक झालो त्यामागे कुठलाही हेतू नव्हता. सामान्य जनता काय म्हणते ते महत्त्वाचे आहे. ईडी जेव्हा आली तेव्हा त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले होते. आम्ही भावनिक झालो कारण तिथे लोकं मोठ्या संख्येने होते असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
May 06, 2024 1:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'जेव्हा ईडी आली तेव्हा त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते'; अजितदादांनी केलेल्या ऍक्टिंगला रोहित पवारांचं प्रत्युत्तर


