Nilesh Ghaiwal : लंडनला पळून जायचं नाही तर निलेश घायवळच्या डोक्यात होता वेगळाच प्लॅन, सोनेगाव कनेक्शन समोर!

Last Updated:

Kusum Ghaiwal Mother On Nilesh Plan : दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं, असं निलेश घायवळची आई म्हणाली आहे.

Nilesh Ghaiwal Mother Kusum Reveal Gangster
Nilesh Ghaiwal Mother Kusum Reveal Gangster
Pune Nilesh Ghaiwal News : कोथरूड गोळीबाराचा मास्टरमाईंड आणि पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ देश सोडून पळाला असून आता त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता गुंड नीलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी कुटुंबाची बाजू न्यूज 18 लोकमतसमोर मांडली. घायवळ कुटुंबाची बाजू समोर येत नसल्याने नीलेशच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केले. न्यूज 18 लोकमतसोबत बोलताना निलेश घायवळच्या आईने मोठा खुलासा केला आहे.

राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी..

माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत. निलेश घायवळला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं, असं निलेश घायवळची आई म्हणाली आहे.
advertisement

सोनेगावच्या जिल्हा परिषदतून...

अहमनगर जिल्ह्यातील सोनेगावच्या जिल्हा परिषदतून निलेश उभं राहणार होता, मात्र विरोधकांनी कट रचून त्यांना अडकवल्याचा दावा निलेश घायवाळच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. सोनेगावमध्ये त्याला राजकारणात डोकं वार काढू दिलं जात नव्हतं, असं निलेश घायवळच्या आईने म्हटलं आहे. त्यामुळे त्याला त्रास दिला जात होता, असं म्हणत निलेश घायवळच्या आईने अहमदनगरमधील कर्जत जामखेडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
advertisement

दोन्ही भावांना राजकारणात उतरायचं होतं

दरम्यान, दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, असंही निलेश घायवळच्या आईने म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Nilesh Ghaiwal : लंडनला पळून जायचं नाही तर निलेश घायवळच्या डोक्यात होता वेगळाच प्लॅन, सोनेगाव कनेक्शन समोर!
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement