Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...

Last Updated:

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नद्या प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. याबाबत धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...
Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...
पुणे : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या जीवनदायिनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांमध्ये प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शहरातील नाले, तसेच उद्योगांचे रसायनयुक्त सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याची कबुली खुद्द महापालिकेच्या पर्यावरण अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवला गेला आहे. तरीदेखील नद्यांच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
नदी शुद्धीकरणासाठी प्रभावी उपाययोजनाची गरज
पवना नदीची लांबी 24.4 किमी, इंद्रायणी 20.6 किमी आणि मुळा नदीची लांबी 12.4 किमी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने पवना नदीवर 25, इंद्रायणीवर 12, तर मुळा नदीवर 10 ठिकाणी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाण्याची तपासणी केली. तपासणीत नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे आढळले आहे. रसायनांचे प्रमाण वाढणे, नाल्यांचे सांडपाणी मिसळणे आणि औद्योगिक उत्सर्जन हे मुख्य कारणीभूत घटक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
काय आहे निष्कर्ष?
ऋतुमानानुसार करण्यात आलेल्या तपासणीत पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले. पवनामध्ये मिळणारे नाले आणि त्यातील प्रदूषित सांडपाणी हे प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद आहे. त्याखालोखाल इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात असून ती औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने रसायनांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.
advertisement
शुद्धीकरणावर भर द्यावा
प्रक्रिया न झालेले सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी शहरातील नद्यांमध्ये थेट सोडले जात आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यास प्राधान्य देण्याऐवजी महापालिकेने नदी सुशोभीकरणाचा घाट घातला आहे. या दुर्लक्षामुळे नद्यांची ‘गटारगंगा’ होऊ लागली आहे. नद्यांना तातडीने पुनरुज्जीवन द्यावे, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ धनंजय शेंडबाळे यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad: जीवनदायिनी झाली विष वाहिनी! पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी, पवना अन् इंद्रायणी...
Next Article
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement