गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या सोशल मीडिया एन्फ्लूएंसरला पोलिसांनी शिकवला धडा, रडत रडत मागितली माफी; Video Viral
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
रिल्सच्या माध्यमातून गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या सोशल मिडिया एन्फ्लूएंसरला पोलिसांनी समज दिली आहे, नक्की हा सोशल मिडिया एन्फ्लूएंसर कोण आहे? जाणून घेऊया...
शिक्षणाचं माहेर घर म्हणून फेमस असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील गुन्हेगारीची चर्चा फक्त राज्यातच नाही तर, संपूर्ण देशातही कमालीची चर्चेत राहिली आहे. सध्या सोशल मीडियावर एका सोशल मिडिया एन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे. त्याने गुन्हेगारीसंबंधित काही व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. त्या व्हिडिओंमुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारीपासून लांब राहा अशी समज दिली आहे. रिल्सच्या माध्यमातून गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या सोशल मिडिया एन्फ्लूएंसरला पोलिसांनी समज दिली आहे, नक्की हा सोशल मिडिया एन्फ्लूएंसर कोण आहे? जाणून घेऊया...
पुण्यातील एका सोशल मिडिया एन्फ्लूएंसरने काही इन्स्टाग्रामवर गुन्हेगारीसंबंधित काही व्हिडिओ शेअर केलेल्या होत्या. त्या व्हिडिओ शेअर करून फेमस होणं या तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्या सोशल मिडिया एन्फ्लूएंसरची मस्ती हडपसर पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. सध्या सोशल मिडियावर तो एन्फ्लूएंसर माफी मागत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला सध्या नेटकरी सोशल मीडियावर तुफान ट्रोल करत असून पोलिसांनी त्याला बरोबर शिकवण दिली आहे, असं म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावर जे कोण युजर्स गुन्हेगारी संबंधित किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्यांच्यावर सायबर क्राइम पोलिस करडी नजर ठेवून आहेत.
advertisement
हडपसर पोलीसांनी त्या तरूणाला गुन्हेगारी संबंधितच्या व्हिडिओ व्हायरल न करण्याची समज दिली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरूण म्हणतोय की, "मी सोशल मीडियावर गुन्हेगारीच्या व्हिडिओ व्हायरल करत होतो. मला हडपसर पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये बोलावून योग्य ती समज दिलेली आहे. मी यापुढे गुन्हेगारीसंबंधित एकही व्हिडिओ व्हायरल करणार नाही आणि तुम्ही सुद्धा यापुढे अशा व्हिडिओ व्हायरल करणार पण नाही आणि काढणार पण नाही." त्याने व्हिडिओच्या शेवटी, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असा सुद्धा सोशल मिडिया एन्फ्लूएंसरला समज दिला आहे. नेमका हा तरूण कोण आहे, याची माहिती समोर आलेली नाही. पण तो नेमका कुठला आहे, याची माहिती समोर आलेली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 3:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या सोशल मीडिया एन्फ्लूएंसरला पोलिसांनी शिकवला धडा, रडत रडत मागितली माफी; Video Viral


