प्रफुल्ल लोढाचा आणखी एक कांड, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक; 5 स्टार हॉटेलमध्ये केला नको तो प्रकार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एका महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ऑर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे.
पुणे : हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रफुल्ल लोढाला पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बावधन पोलीस ठाण्यात 36 वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासाठी बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या
पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ऑर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे. लोढानं पीडित महिलेला पतीस नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिला एका हॉटेल मध्ये बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी महिलेनं बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून लोढा विरोधात गुन्हा दखल करण्यात आला होता.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
17 जुलै रोजी पुण्यातील एका महिलेनं बावधन पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही तक्रार दिली आहे. आरोपी लोढा याने आपल्यावर पिंपरी चिंचवड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा दावा या महिलेनं केला आहे. 27 मे 2025 रोजी हा अत्याचार झाल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीनं पीडित महिलेला आणि तिच्या पतीला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. यानंतर त्याने जबरदस्ती करत अत्याचार केला आहे. या अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित महिला घाबरली होती. अखेर महिलेने 17 जुलै रोजी तिने बावधन पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
advertisement
कोण आहे प्रफुल्ल लोढा?
प्रफुल्ल लोढा हा एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. पण नंतर प्रफुल्ल लोढाने त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या पाच दिवसात लोढाकडून माघार घेण्यात आली होती. कथित समाजसेवक आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 22, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रफुल्ल लोढाचा आणखी एक कांड, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक; 5 स्टार हॉटेलमध्ये केला नको तो प्रकार