नाशिकच्या पठ्ठ्याचा पराक्रम, टोकियोत घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, अंगावर शहारे आणणारा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुळचा नाशिकचा असलेल्या सर्वेश कुशारने फायनल सामन्यातील शेवटच्या प्रयत्नान 2.28 मीटरची उंची पार करत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनानंतर त्याने मैदानात 'छत्रपती शिवाजी महाराज की जय',असा जयघोष केला आहे.
World Athletics Championship 2025 : टोकीओमध्ये सध्या वर्ल्ड ॲथलेटीक्स चॅम्पियन्सशीप 2025 ची स्पर्धा सूरू आहे.या स्पर्धेत मुळचा नाशिकचा असलेल्या सर्वेश कुशारने फायनल सामन्यातील शेवटच्या प्रयत्नान 2.28 मीटरची उंची पार करत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनानंतर त्याने मैदानात 'छत्रपती शिवाजी महाराज की जय',असा जयघोष केला आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच सर्वेश कुशारेचा कृतीच आता कौतुक होत आहे.
advertisement
वर्ल्ड ॲथलेटीक्स चॅम्पियन्सशीप 2025 उंच उडी स्पर्धेच्या फायनलसाठी पात्र ठरणारा सर्वेश कुशार हा पहिला भारतीय होता.त्यामुळे देशाच्या आशा त्याच्याकडून उंचावल्या होत्या. उंच उंडी स्पर्धेत तो सुवर्ण कामगिरी असेल अशी आशा होती. पण तो अपयशी ठरला. पण अपयशी ठरताना देखील तो आपली सर्वोत्तम कामगिरी करून गेला.सर्वेशने जिद्द न सोडता आपल्या शेवटच्या प्रयत्नात 2.28 मी ची उंची पार करत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. या कामगिरीनंतर सर्वेशने मैदान जयघोष करत आपला आनंद व्यक्त केला.सर्वेश कुशारेने 'छत्रपती शिवाजी महाराज कि जय' असा जयघोष मैदानात केला होता.या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
advertisement
" Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai!!! 🚩”
- Sarvesh Kushare after he clears a Personal Best of 2.28m at World Athletics C'ship 2025! pic.twitter.com/vsTTyLC2c2
— The Khel India (@TheKhelIndia) September 16, 2025
न्यूझीलंडचा हमिश केरने 2.36 मीटरच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले. त्याचा प्रयत्न चालू हंगामातील कोणत्याही खेळाडूचा सर्वोत्तम कामगिरी होता. तर कोरियाचा सेंघ्योक वू 2.34 मीटरच्या त्याच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर चेक प्रजासत्ताकचा जान स्टेफेला 2.31 मीटरच्या प्रयत्नाने तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
advertisement
नाशिकचा रहिवासी आर्मी नायब सुभेदार कुशारेने 2.28 मीटरची उडी मारली. अशाप्रकारे तो क्रमवारीत सहाव्या स्थानी राहिला. या सर्वोत्तम कामगिरीनंतर त्याने प्रेक्षकांकडे पाहिले आणि म्हणाला, "छत्रपती शिवाजी महाराज की जय."
पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळलेला कुशारे हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारा भारतातील पहिला उंच उडीपटू आहे. 2022 च्या आशियाई स्पर्धेत तो चौथ्या स्थानावर राहिला, पदकापासून थोडक्यात वंचित राहिला. बुडापेस्ट येथे झालेल्या 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, तो पात्रता गट ब मध्ये 11व्या आणि 33 स्पर्धकांपैकी एकूण 20 व्या स्थानावर राहिला.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
नाशिकच्या पठ्ठ्याचा पराक्रम, टोकियोत घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, अंगावर शहारे आणणारा VIDEO