Pune Crime : पुणे पोलिसांचा दणका! आयुष कोमकर हत्या प्रकरणात आणखी 4 आरोपींना गुजरातमधून अटक, पाहा कोण कोण?

Last Updated:

Ayush Komkar Murder Case : आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी या हत्येमागे आयुषचे आजोबा आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संपूर्ण आंदेकर टोळीला अटक करण्यात आलीये.

Ayush Komkar Murder Case 4 more accused
Ayush Komkar Murder Case 4 more accused
Pune Crime News : पुणे शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर या तरुणाच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आंदेकर कुटुंबातील चौघांना पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आजी लक्ष्मी आंदेकरसह इतर तिघांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या

काही दिवसांपूर्वी 19 वर्षीय आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या गेल्या वर्षी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी केल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये आयुषचे वडील गणेश कोमकर हे आरोपी आहेत. आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी या हत्येमागे आयुषचे आजोबा आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा हात असल्याचा आरोप केला होता.
advertisement

पोलिसांना गुजरातमधून टीप मिळाली अन्...

याच आरोपांनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस पथकाला ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुजरातमध्ये धडक देऊन शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या चार आरोपींना अटक केली.

कटात आणखी कोण कोण सामील? 

advertisement
दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीही काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मूळ आरोपी आणि कटात सामील असलेल्या इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत. या हत्येमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे पोलिसांचा दणका! आयुष कोमकर हत्या प्रकरणात आणखी 4 आरोपींना गुजरातमधून अटक, पाहा कोण कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement