Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर 'मृत्यूचा सापळा', 22 गाड्या एकमेकांना का धडकल्या? CP अमितेश कुमार यांनी सांगितलं कारण!

Last Updated:

Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावलं याच कारणामुळे हा अपघात घडला. जड वाहनाने अनेक वाहनांना धडक दिली, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

Pune Navale Bridge Accident
Pune Navale Bridge Accident
Pune Navale Bridge Accident : नवले ब्रीज अपघात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये. तर तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमी अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आता पोलिसांनी महत्त्वाची वक्तव्य केली आहेत.

लहान स्पीड ब्रेकर ब्रेक फेल?

राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान स्पीड ब्रेकर आहेत, त्यामुळे ब्रेक फेल झाल्याची शक्यता आहे, असं डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितलं आहे.
advertisement

जड वाहनाने नियंत्रण गमावलं अन्... - अमितेश कुमार

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात, "पुणे-बेंगळुरू महामार्गावर आज नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावलं याच कारणामुळे हा अपघात घडला. जड वाहनाने अनेक वाहनांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हजेरी लावली आणि परिस्थिती हाताळली. ट्रॅफिक देखील आता सुरळीत झालं आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आम्ही मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
advertisement

कंटेनर चालकाचाही मृत्यू

दरम्यान, एका भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं. ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरनं समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. जवळपास 20 ते 25 वाहनांना धडक दिली. या अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला आहे, या अपघातात कंटेनर चालकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील नवले पुलावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर 'मृत्यूचा सापळा', 22 गाड्या एकमेकांना का धडकल्या? CP अमितेश कुमार यांनी सांगितलं कारण!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement