Pune Crime : बापाला 'एन्काऊंटरची वॉर्निंग' अन् 24 तासातच कृष्णा आंदेकरने केलं सरेंडर! पुणे पोलिसांनी सुत्र कशी फिरवली?

Last Updated:

Krushna Andekar surrender to Pune Police : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झालाय. कृष्णा आंदेकर याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Krushna Andekar surrender to Pune Police
Krushna Andekar surrender to Pune Police
Pune Crime News : स्वत:च्या भाच्याला संपवणारा खुंखार कंस मामा म्हणजेच कृष्णा आंदेकर याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आयुष आंदेकर मर्डर केसमध्ये कृष्णा आंदेकर याने समर्थ पोलीस ठाण्यात सरेंडर केलं असून आता पोलिसांनी सर्व 13 आरोपींना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी पुणे पोलिसांनी कृष्णासाठी एक मेसेज पाठवला होता. त्यानंतर कृष्णाने गुडघे टेकवले आहे. नेमकं काय झालं? वाचा

स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झालाय. कृष्णा आंदेकर याच्यावर ज्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा तो मुलगा आहे. बंडू आंदेकर याच्याकडून पोलिसांनी थेट वॉर्निंग दिली होती. त्यानंतर आता कृष्णा सरेंडर झाला आहे.
advertisement

नाहीतर एन्काऊंटर करू

कृष्णराज आंदेकर हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. मात्र आज तो समर्थ पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याचं एन्काऊंटर करू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने न्यायालयात केला होता. मात्र, तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी आरोप फेटाळला. पोलिसांच्या या धमकीमुळे कृष्णाची तंतरली आणि त्याने सरेंडर केलं आहे.
advertisement

सर्व 13 आरोपींना अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व 13 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींमध्ये मुख्य आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

अटकेतील आरोपींची नावे 

बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाठोळे आणि सुजल मिरगू.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : बापाला 'एन्काऊंटरची वॉर्निंग' अन् 24 तासातच कृष्णा आंदेकरने केलं सरेंडर! पुणे पोलिसांनी सुत्र कशी फिरवली?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement