Pune Crime : पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना! 11 व्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाचा मृत्यू

Last Updated:

Pune Crime News : विजयवर रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याने रुग्णालयाच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवलं.

Pune Crime Sassoon hospital Psychiatric patient
Pune Crime Sassoon hospital Psychiatric patient
Pune Crime Sassoon hospital : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील ससून हॉस्पिटल माध्यमांमध्ये चर्चेत आहे. कालच एका रुग्णालयाचा ससूनमध्ये उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अशातच आता ससून रुग्णालयात आज सकाळी एका मनोरुग्णाने 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मनोरुग्णाचे नाव विजय असे असून, त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय नावाच्या या रुग्णाला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अशातच आता विजयने स्वत:ला संपवल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

11 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

यापूर्वी विजयने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केलं होतं. अशातच रुग्णाने पुन्हा आत्महत्येचं पाऊल उचलल्याने ससून रुग्णालयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विजयवर रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याने रुग्णालयाच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवलं.
advertisement

हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू

दरम्यान, या घटनेनंतर ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सरकारी ससून रुग्णालयातील संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे कातकरी आदिवासी तरुणाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची घटना काल समोर आली होती. तब्बल दोन तास रुग्णालयाच्या जमिनीवर वेदनेने विव्हळत या तरुणाचा मृत्यू झाला. तब्बल दोन तास रुग्णालयाच्या जमिनीवर पडूनही त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना! 11 व्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाचा मृत्यू
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement