Pune Crime : बंडू आंदेकरची 'तिसरी मुलगी' आयुषच्या हत्या प्रकरणात कशी अडकली? कल्याणी कोमकरने सख्या बहिणीलाही सोडलं नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ayush Komkar Murder Case Update : आयुषची फिर्याद नोंदवताना कल्याणी कोमकरने नाना पेठेतच राहणाऱ्या तिच्या सख्या बहिणीवर देखील आरोप केले असून आयुषच्या हत्येमागे वृंदावनी वाडेकर आणि तिच्या दोन्ही मुलांचा देखील हात होता, असं म्हटलं आहे.
Pune Crime News : गोविंद उर्फ आयुष कोमकर या 19 वर्षाच्या तरुणाची पुण्यातील नाना पेठेत हत्या करण्यात आली होती. कुख्यात गुंड बंदू आंदेकर याने स्वत:च्या नातवाला संपवल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. या प्रकरणात आता आरोपींना अटक करण्यात आली असून पुण्यात संतापाचं वातावरण आहे. आरोपी बंडू आंदेकर याला बुलढाण्यात अटक करण्यात आली होती. यावेळी बंदू आंदेकरच्या तिसऱ्या मुलीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
कल्याणी कोमकरचा बहिणीवर आरोप
वृंदावनी वाडेकर हिला देखील पुणे पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात रोवलं असून तिच्यावर देखील सख्या बहिणीने म्हणजेच कल्याणी कोमकरने सनसनाटी आरोप केले आहेत. आयुषची फिर्याद नोंदवताना कल्याणी कोमकरने नाना पेठेतच राहणाऱ्या तिच्या सख्या बहिणीवर देखील आरोप केले असून आयुषच्या हत्येमागे वृंदावनी वाडेकर आणि तिच्या दोन्ही मुलांचा देखील हात होता, असं म्हटलं आहे. तर वृंदावनी वाडेकर ही बुलढाण्यात पळ काढताना सापडल्याने देखील पोलिसांचा संशय बळावला आहे.
advertisement
विमानाने प्रवासाने केरळ पर्यटन
आयुषची हत्या झाली या कालावधीत बंडूने विमानाने प्रवास करून केरळ पर्यटन केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दक्षिण भारतातील पद्मनाभस्वामी मंदिरासह इतर मंदिरांना देखील त्याने भेटी दिल्या. या वेळी त्याच्यासोबत तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, त्या दोघांच्या बायका आणि वृंदावनी वाडेकर बंडू वाडेकरसोबत होती. प्रॉपर्टीच्या वादात वृंदावनी हिने देखील भावांची बाजू घेतली अन् कोमकर भगिंनीना वाऱ्यावर सोडलं होतं. त्यामुळे कोमकरांचा वाडेकरांवर राग होता.
advertisement
वृंदावनी वाडेकरच्या अडचणी वाढणार?
वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीमधील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अभिषेक आंदेकर, वृंदावनी वाडेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आदेकर यांनी संगनमताने कट रचून हत्या केल्याचा आरोप कल्याणी कोमकरने केला आहे. त्यामुळे आता वृंदावनी वाडेकर आणि तिच्या दोन्ही मुलांना जामीन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 10, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : बंडू आंदेकरची 'तिसरी मुलगी' आयुषच्या हत्या प्रकरणात कशी अडकली? कल्याणी कोमकरने सख्या बहिणीलाही सोडलं नाही!