शिकवणी वर्ग संपवून रात्री घरी निघालेली शिक्षिका; चोरट्यांनी रस्त्यात गाठलं अन्..., कोंढव्यातील घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चोरट्यांनी अत्यंत वेगाने सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि भरधाव वेगाने दुचाकीवरून पसार झाले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने तात्काळ आरडाओरडा केला,
पुणे: शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोंढवा परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार महिला कोंढवा बुद्रुक भागात राहतात. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी 11 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिकवणी वर्ग संपवून त्या आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाल्या होत्या. काकडे वस्ती परिसरातून जात असताना, मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी अचानक त्यांना गाठलं.
advertisement
चोरट्यांनी अत्यंत वेगाने सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि भरधाव वेगाने दुचाकीवरून पसार झाले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने तात्काळ आरडाओरडा केला, मात्र चोरटे नजरेआड झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पसार झालेल्या चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात, विशेषतः महिला पादचारी आणि दुचाकीस्वार महिलांना लक्ष्य करून दागिने व मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
शिकवणी वर्ग संपवून रात्री घरी निघालेली शिक्षिका; चोरट्यांनी रस्त्यात गाठलं अन्..., कोंढव्यातील घटना










