John Cena ची निवृत्ती अन् WWE चा अंडरटेकर भावूक, म्हणाला 'तू 23 वर्षापूर्वी भेटला तेव्हा...'

Last Updated:

Undertaker Post On John Cena : WWE च्या रिंगमधील 'डेड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंडरटेकरने जॉन सीना याला शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन सीनासाठी त्याने एक भावूक पोस्ट देखील लिहिलीये.

News18
News18
WWE सुपरस्टार जॉन सीना (John Cena) आता रिंगमध्ये दिसणार आहे. शनिवारी झालेल्य मॅचनंतर जॉन सीना निवृत्त झाला आहे. अधिकृतरित्या त्याने याची घोषणा केली आहे. मैदानात बुट ठेवून त्याने रिंगला रामराम ठोकला. अशातच WWE च्या रिंगमधील 'डेड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंडरटेकरने जॉन सीना याला शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन सीनासाठी त्याने एक भावूक पोस्ट देखील लिहिली आहे. काय म्हणाला डेड मॅन?

अंडरटेकर काय म्हणाला?

नाईस जॉब हेच शब्द मी 23 वर्षांपूर्वी, जेव्हा तू पदार्पण केलेस, तेव्हा तुला म्हणालो होतो. आता, तुझ्या शेवटच्या सामन्याच्या दिवशी, मी पुन्हा एकदा म्हणतो... नाईस जॉब... मेहनत, निष्ठा आणि आदर ही केवळ एक घोषणा नाही. 23 वर्षे तू या शब्दांनुसार जगला आहेस. आमच्या व्यवसायाबद्दलची तुझी आवड आणि आमच्या चाहत्यांप्रती असलेले तुझे समर्पण अतुलनीय आहे, असं म्हणत अंडरटेकरने जॉन सीना याला शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Undertaker (@undertaker)



advertisement
तुझ्यासोबत रिंगमध्ये उतरणे आणि तुझ्या प्रवासाचा एक भाग असणे हा माझ्यासाठी सन्मान होता. तुझी रिंगमधील कारकीर्द संपत असताना, तू केलेल्या कामाबद्दल आणि निर्माण केलेल्या आठवणींबद्दल अभिमान बाळग. आज रात्री तुझ्या या शेवटच्या प्रवासाचा आनंद घे, माझ्या मित्रा, आणि शेवटच्या वेळी... नाईस जॉब, असंही अंडरटेकर म्हणाला.
advertisement
जॉन सीनाचा अखेरचा सामना वॉशिंग्टन डी.सी. येथील कॅपिटल वन अरेनामध्ये खेळला गेला. मॅचच्या निर्णायक क्षणी गुंथरने सीना याला 'स्लीपर होल्ड' मध्ये पकडले आणि त्यांना 'टॅप आऊट' (पराभव मान्य करणं) करावे लागले. गेल्या जवळपास 20 वर्षांच्या कारकीर्दीत सीना यांनी 'टॅप आऊट' होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे जॉन मुद्दामहून सामना हरला का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
John Cena ची निवृत्ती अन् WWE चा अंडरटेकर भावूक, म्हणाला 'तू 23 वर्षापूर्वी भेटला तेव्हा...'
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement