'त्याला नाही सांग'! लग्नाच्या 'कांदे-पोहे' कार्यक्रमावरून वाद; कोरेगाव पार्कमध्ये मैत्रिणीनेच तरुणीचा चाकूने गळा चिरला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुजाला लग्नाकरता पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. परंतु तिला हे लग्न मान्य नव्हतं. तिने आपली मैत्रीण कोमल हिला विनंती केली की, तिने त्या पाहुण्यांना फोन करून 'पाहण्याचा कार्यक्रम रद्द झाला आहे, तुम्ही येऊ नका' असे सांगावे.
पुणे: लग्नासाठी पाहुणे येणार असल्याने ते टाळण्यासाठी एका तरुणीने मैत्रिणीची मदत मागितली. मात्र, मदत न केल्यानं पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. कोरेगाव पार्क येथील दरवडे मळा परिसरात गुरुवारी (१८ डिसेंबर) दोन मैत्रिणींमध्ये याच कारणावरुन झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना फोन करून 'येऊ नका' असे सांगण्यास नकार दिल्याने, संतप्त झालेल्या तरुणीने आपल्याच मैत्रिणीवर चाकूने सपासप वार करून तिला जखमी केले.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पुजा (२९) आणि जखमी कोमल (नाव बदललेले, वय २९) या दोघी कोरेगाव पार्क परिसरात वास्तव्यास असून त्यांच्यात जुनी आणि घट्ट मैत्री आहे. पुजाला लग्नाकरता पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. परंतु तिला हे लग्न मान्य नव्हतं. तिने आपली मैत्रीण कोमल हिला विनंती केली की, तिने त्या पाहुण्यांना फोन करून 'पाहण्याचा कार्यक्रम रद्द झाला आहे, तुम्ही येऊ नका' असे सांगावे.
advertisement
कोमलने पुजाच्या या मागणीला स्पष्ट शब्दांत नकार दिला. दुसऱ्याच्या घरगुती विषयात पडण्यास तिने असमर्थता दर्शवली. गुरुवारी या दोघींची भेट झाली असता, याच कारणावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात पुजाने स्वतःजवळील चाकू काढून कोमलच्या हातावर आणि गळ्याच्या जवळ वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोमल गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
या प्रकरणी कमलने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अश्विनीवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'त्याला नाही सांग'! लग्नाच्या 'कांदे-पोहे' कार्यक्रमावरून वाद; कोरेगाव पार्कमध्ये मैत्रिणीनेच तरुणीचा चाकूने गळा चिरला









