पुण्यात घर हवंय? ही संधी सोडू नका! ‘म्हाडा’च्या घरांसाठी 10 डिसेंबरपर्यंत करा अर्ज
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
MHADA Pune: पुण्यात हक्काचं घर घेण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
पुणे : पुण्यात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न साकार करण्याची आणखी एक संधी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 10 ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 12 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता अर्ज करण्याची मुदत एका महिन्याने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुकांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.
महिन्याची मुदतवाढ
पुण्यात घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. म्हाडाच्या घरांमुळे गोरगरिबांनाही हे स्वप्न साकार करण्याची संधी मिळते. म्हाडातर्फे 6 हजार 294 सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी 12 नोव्हेंबर अशी अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र या काळात दिवाळी सण तसेच विधानसभा निवडणुकीमुळे अनेकांना अर्ज करता आले नाही. परिणामी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती साकोरे यांनी यावेळी दिली.
advertisement
अर्ज करण्याची अंतिम तारीख
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 10 डिसेंबर असेल. 10 डिसेंबर रोजी पाच वाजेपर्यंतची ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज सादर करण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत तर ऑनलाइन पेमेंट स्वीकृतीसाठी 12 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 13 डिसेंबर अशी मुदत देण्यात आली असून 7 जानेवारी 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती साकोरे यांनी दिली.
advertisement
दरम्यान, पुण्यात घर घेण्यासाठी इच्छुकांना आणखी एक संधी मिळाली असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2024 11:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात घर हवंय? ही संधी सोडू नका! ‘म्हाडा’च्या घरांसाठी 10 डिसेंबरपर्यंत करा अर्ज