Vande Bharat: आता पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, पंतप्रधान दाखवणार वंदे भारतला हिरवा झेंडा

Last Updated:

Vande Bharat: प्रवाशांचा तब्बल तीन तासांचा वेळ वाचणार आहे. यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Vande Bharat: आता पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
Vande Bharat: आता पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
पुणे: राज्याची सांस्कृतिक राजधीनी पुणे आणि राज्याची उपराजधानी नागपूर ही दोन महत्त्वाची शहरे आता अधिक वेगाने जोडली जाणार आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. या आधुनिक आणि जलदगती गाडीचा शुभारंभ येत्या 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑडिओव्हिज्युअल प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे आणि नागपूरदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे.
जलद आणि आरामदायक प्रवासाची नवी सुविधा
वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. सध्या इतर एक्सप्रेस गाड्यांना या प्रवासासाठी सुमारे 15 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस केवळ 12 तासांत हे अंतर पार करणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा तब्बल तीन तासांचा वेळ वाचणार आहे. यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान जलदगती गाडी उपलब्ध व्हावी यासाठी नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत होते. ही मागणी आता पूर्ण होणार आहे.
advertisement
प्रमुख स्थानकांवर थांबा
ही गाडी नागपूरहून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या मार्गावर अजनी (नागपूर), वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या प्रमुख स्थानकांवर गाडीचा थांबा असेल.
advertisement
आरामदायी आसनांची मागणी
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सध्या फक्त बैठक आसनांची व्यवस्था आहे. पुणे ते नागपूर प्रवासाचा कालावधी 12 तासांचा असल्यामुळे प्रवाशांकडून आरामदायी झोपण्यायोग्य आसनांची मागणी होत आहे. यासंदर्भात रेल्वे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितलं की, प्रवाशांच्या सूचनांची नोंद घेऊन लवकरच रेल्वे बोर्डाकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Vande Bharat: आता पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, पंतप्रधान दाखवणार वंदे भारतला हिरवा झेंडा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement