Nawale Bridge: आम्हाला बाहेर काढा...आक्रोश, भेदरलेल्या नजरा; आमच्या डोळ्यांदेखत झाला माणसांचा कोळसा, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : नवले ब्रीजवर झालेल्या भीषण अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
advertisement
गुरुवारी संध्याकाळी नवले ब्रीजवर झालेल्या अपघातामुळे पुणे हादरले आहे. .या अपघातात दोन कंटेनर आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला होता.हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कंटेनरच्या मधोमध अडकलेल्या कारचा चेंदामेंदा झाला. या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते, अशीही प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे.प्रत्यक्षदर्शींना अपघाताचा थरार सांगितला आहे.
advertisement
आम्हाला बाहेर काढा..... नवले ब्रीजवर आक्रोश, किंकाळ्या
प्रत्यक्षदर्शींना माध्यमांशी बोलताना सांगतिले की, स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही पळत गेलो. आमच्यासमोर कंटनेरला आग लागली होती. त्यामध्ये माणूस अडककला होता आणि तो आम्हाला काढा.... आम्हाला काढा असे म्हणत होता. तो आपघातग्रस्त कंटेनकमध्ये जो क्लिनर होता तो ओरडत होता पण आग प्रचंड लागल्यामुळे कोणी गेला नाही,. आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने आम्ही त्याला काढूच शकलो नाही, कारण सगळ्यांना भीती वाटत होती की गाडी ब्लास्ट झाली तर आम्ही घाबरल्याने गेलो नाही पण आमच्या डोळ्यांदेखत त्या माणसाचा कोळसा झाला.
advertisement
दुसरा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाला?
तर दुसरा प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, खेड शिवापूरकडून पुण्याच्या दिशेन गाडी वेगात येत होती. मात्र गाडीचा ब्रेक झाल्याने त्याला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्याने कारला धडक दिली. कारमध्ये पाच लोकं होती. ती पुढच्या कंटेनरमध्ये जाऊन धडकली दोन्ही कंटनेरमध्ये अडकलेल्या कारचा चेंदामेदा झाला आणि कारमधील लोकांचा कोळसा झाला. कंटेनरचा ड्रायव्हर, क्लिनर यांना प्रचंड आग लागल्याने बाहेर पडता आले नाही, त्यांचा देखील जळून कोळसा झाला. 20-25 जण जखमी झाले असून मृत्यूचा आकडा 7-8 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 7:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Nawale Bridge: आम्हाला बाहेर काढा...आक्रोश, भेदरलेल्या नजरा; आमच्या डोळ्यांदेखत झाला माणसांचा कोळसा, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार


