Pune Crime: पुणेकरांनो, घरात दागिने ठेवण्याची चूक करू नका; 27 लाखाच्या चोरीची ही घटना वाचून भरेल धडकी

Last Updated:

तक्रारदार हे व्यवसायानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी थेट बेडरूम गाठून कपाटाचे लॉक उचकटले

पुण्यात घरफोडी (AI Image)
पुण्यात घरफोडी (AI Image)
पुणे : पुण्यातून चोरीच्या रोज काही ना काही घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. यात पुण्यातील गजबजलेल्या भवानी पेठ परिसरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. यात एका व्यावसायिकाच्या बंद घराचं लॉक तोडून तब्बल २७ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी मध्यरात्री 'पद्मजी पॅरेडाइज' सोसायटीत घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी थेट बेडरूम गाठून कपाटाचे लॉक उचकटले. कपाटात ठेवलेली १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे मौल्यवान दागिने असा एकूण २७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. व्यावसायिक घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसले, त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.
advertisement
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती भागात एवढी मोठी घरफोडी झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणेकरांनो, घरात दागिने ठेवण्याची चूक करू नका; 27 लाखाच्या चोरीची ही घटना वाचून भरेल धडकी
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement