advertisement

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी साठवून ठेवा; 'या' दिवशी अर्ध्या पुण्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Last Updated:

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत

शहराच्या निम्म्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
शहराच्या निम्म्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे गुरुवारी (२९ जानेवारी) शहराच्या निम्म्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
शुक्रवारी पाणी उशिरा आणि कमी दाबाने: महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर पाणी बंद राहिल्यानंतर, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग:
मध्यवर्ती पुणे: सर्व पेठा (कसबा, भवानी, नाना, शुक्रवार, गणेश पेठ इ.), दत्तवाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर आणि स्वारगेट.
advertisement
पर्वती आणि बिबवेवाडी परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, इंदिरानगर, गंगाधाम, पर्वती दर्शन आणि पर्वती गावठाण.
सिंहगड रोड आणि उपनगरे: हिंगणे, आनंदनगर, धायरी, वडगाव, आंबेगाव पठार, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी आणि कात्रज.
कोंढवा आणि येवलेवाडी: मितानगर, कोंढवा खुर्दचा काही भाग आणि संपूर्ण येवलेवाडी परिसर.
नगर रोड परिसर: खराडी गावठाण, चंदननगर, गणेशनगर, आनंदपार्क, यशवंतनगर आणि इऑन आयटी पार्क परिसर.
advertisement
पश्चिम पुणे: वारजे, शिवणे, बाणेर, पाषाण, औंध, कोथरूड (एसएनडीटी परिसर), गांधी भवन आणि चतुरश्रृंगी परिसर.
दुरुस्तीची ठिकाणे: पर्वती (जुने व नवीन), वडगाव, लष्कर, वारजे, होळकर आणि चिखली जलकेंद्रांसह राजीव गांधी पंपिंग स्टेशन आणि खडकवासला जॅकवेलमधील तांत्रिक कामे यावेळी केली जाणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी साठवून ठेवा; 'या' दिवशी अर्ध्या पुण्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement