advertisement

मुंबईकर लोकलने प्रवास करताना जरा जपून, तुमच्यावर 12000 CCTV चा ‘वॉच’, परेचा मोठा निर्णय!

Last Updated:

Mumbai Local: सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आरपीएफसोबतच आगामी काळात पश्चिम रेल्वेवर सुमारे 4,000 अतिरिक्त जवानांची तैनाती होण्याची शक्यता आहे.

मुंबईकर, लोकलने प्रवास करताना जरा जपून, तुमच्यावर 12000 CCTV चा ‘वॉच’, परेचा मोठा निर्णय!
मुंबईकर, लोकलने प्रवास करताना जरा जपून, तुमच्यावर 12000 CCTV चा ‘वॉच’, परेचा मोठा निर्णय!
मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मालाड येथे घडलेल्या अलीकडील घटनेनंतर सतर्कता वाढवत सुमारे 1,500 एसी आणि नॉन-एसी लोकल डब्यांमध्ये 12,000 पेक्षा अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 97 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यामुळे मुंबई लोकलची सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
आतापर्यंत महिलांच्या डब्यांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक प्रणाली प्राधान्याने बसवली जात होती. मात्र आता सामान्य डब्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित घटना अपवादात्मक असली तरी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी वाढवणे आवश्यक असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
या योजनेअंतर्गत उपनगरीय सेवेत धावणाऱ्या लोकल आणि मेमू ट्रेनमध्ये एकूण 12,006 डोम आणि वेज प्रकारचे कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये फेस रिकग्निशन प्रणाली आणि प्रगत व्हिडिओ अॅनालिटिक्सची सुविधा असेल. त्यामुळे डब्यातील गर्दी, गोंधळ, संशयास्पद हालचाली किंवा अनुचित प्रकारांवर प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. डिसेंबरअखेरीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या पुरवठा, बसवणी आणि देखभालीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कंत्राट मंजूर झाल्यानंतर पुढील 10 महिन्यांत सर्व डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होणार आहे.
advertisement
चर्चगेट ते डहाणू दरम्यानच्या 123 किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल डब्यांमध्ये हे सीसीटीव्ही कार्यरत असतील. यामध्ये मोटरमनच्या दोन केबिन्स तसेच ट्रेन मॅनेजरवरही देखरेख ठेवली जाणार आहे. सर्व घडामोडींचे रेकॉर्डिंग किमान 30 दिवसांसाठी जतन केले जाणार असून गरज भासल्यास तपासासाठी ते उपलब्ध असेल.
दरम्यान, सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आरपीएफसोबतच आगामी काळात पश्चिम रेल्वेवर सुमारे 4,000 अतिरिक्त जवानांची तैनाती होण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रियाही सध्या सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर लोकलने प्रवास करताना जरा जपून, तुमच्यावर 12000 CCTV चा ‘वॉच’, परेचा मोठा निर्णय!
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement