advertisement

छत्री घ्यायची, स्वेटर घालायचा की AC लावायचा? 24 तासांत बिघडलं वातावरण, हवामान विभागाकडून अलर्ट

Last Updated:

महाराष्ट्रात ठाणे, मुंबई, उपनगरांत पावसाने हजेरी लावली. वेस्टर्न डिस्टरबन्समुळे फेब्रुवारीत थंडी वाढणार. जळगाव, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता.

News18
News18
जानेवारी महिना संपता संपता निसर्गाने आपलं रूप पूर्णपणे बदललं आहे. कुठे बर्फाचा थर साचलाय, तर कुठे अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. महाराष्ट्रातही गेल्या दोन दिवसांत ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने 'सरप्राईज' हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण होण्याऐवजी आर्द्रतेमुळे उकाडा वाढला असला, तरी आता पुन्हा एकदा हुडहुडी भरवणारी थंडी परतणार आहे.
हवामानाचा खेळ बिघडला
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि नव्याने तयार होणाऱ्या 'वेस्टर्न डिस्टरबन्स'मुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याचा गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, याच काळात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचे सावट असल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
गारपीट, थंडी आणि पाऊस
जानेवारी महिन्याच्या अखेरीस हवामान खूप बिघडलं आहे. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे गारपीट तर कुठे हिमवृष्टी होत आहे. महाराष्ट्रातही 27 जानेवारी रोजी ठाणे, उपनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. मागच्या दोन तीन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. महाराष्ट्रात त्यामुळे कमाल तापमानात २-३ अंशांनी वाढ झाली आहे. रात्री उकडत आहे. मात्र पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.
advertisement
नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचं संकट
नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला असून थंड वारे उत्तरेकडून येत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील गारठा कायम राहणार आहे. 30 जानेवारी रोजी पश्चिमी विक्षोभ तयार होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देखील हवामानावर होणार आहे. अरबी समुद्रातून उष्ण वारे देखील उत्तरेच्या दिशेने जात आहेत. 2 दिवसांमध्ये 2-4 डिग्री तापमान पुन्हा खाली घसरण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुढचे चार दिवस तापमान हळूहळू वाढणार आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात हवामानाचे अपडेट
उत्तर महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस हळूहळू 2-3 डिग्री तापमान घसरणार आहे. त्यानंतर पुढचे 3 दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात फारसा बदल होणार नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
कुठे पडणार पाऊस?
कोकणात मुख्यत्वे ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे दमट आणि उष्ण असल्याने उकाडा जाणवेल. पहाटेच्या वेळी गार वाऱ्यांमुळे थोडासा दिलासा मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात मळभ राहील. उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. जळगाव, नाशिक, धुळ्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या दरम्यान ४० किमी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आदी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट शक्य आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्री घ्यायची, स्वेटर घालायचा की AC लावायचा? 24 तासांत बिघडलं वातावरण, हवामान विभागाकडून अलर्ट
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement