पुण्यात खळबळजनक घटना! शिक्षकासमोरच चिरला विद्यार्थ्याचा गळा, दहावीच्या मुलांमध्ये गँगवार
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये खासगी क्लासमध्येच गँगवार पाहायला मिळालं. यात काही विद्यार्थ्यांनी शिक्षकासमोरच विद्यार्थ्याचा गळा चिरला
पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. यात राजगुरूनगरमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकासमोरच गळा चिरण्यात आला. घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच हा हल्ला झाला आहे. घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये खासगी क्लासमध्येच गँगवार पाहायला मिळालं. यात काही विद्यार्थ्यांनी शिक्षकासमोरच विद्यार्थ्याचा गळा चिरला. विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवर घटनास्थळावरून फरार झाला.
नेमकं काय घडलं?
सकाळच्या वेळी दहावीचा क्लास सुरू होता. याचवेळी काही विद्यार्थ्यांनी येत हल्ला केला. याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये गँगवार पाहायला मिळालं. बचावासाठी बाहेर पळाल्यावरही हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामागं नेमकं काय कारण होतं, हे अद्याप समोर आलेलं नाही.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने क्लासच्या ठिकाणी धाव घेतली आणि पंचनामा केला. क्लासरूममध्ये झालेला हा खून पाहून सगळेच चक्रावले. भर दिवसा आणि शिक्षकांच्या समोरच विद्यार्थ्याची हत्या झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी घटनेच्या प्राथमिक तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, फरार झालेल्या आरोपी विद्यार्थ्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात खळबळजनक घटना! शिक्षकासमोरच चिरला विद्यार्थ्याचा गळा, दहावीच्या मुलांमध्ये गँगवार











